Mehkar Vidhan Sabha Constituency 2024 : मेहकर विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी एक आहे. मेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात स्थित एक टेबलटॉप तहसील आणि नगरपरिषद आहे. पेनगंगा नदीच्या काठावर वसलेले मेहकर हे महाराष्ट्राच्या विदर्भात येते. 


बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदार संघ हा शिवसेनेचा गड आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर या मतदारसंघाचे गेल्या तीन वेळा प्रतिनिधित्व करत असलेले डॉ. संजय रायमुलकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आणि त्यांना यंदा पाचव्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. तर त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सिद्धार्थ खरात हे निवडणूक लढवत आहेत. 


सिद्धार्थ खरात हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत आपल्याला बघायला मिळत आहे. उभाठा गटाचे उमेदवार असलेले सिद्धार्थ खरात निवडणुकीत नवखे असले तरी मात्र त्यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केलेले डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासमोर मोठा आव्हान उभं केलेल आहे.  त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असलेल्या या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे अद्याप स्पष्ट नाही.


2019 मध्ये काय घडलं?


2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संजय रायमुलकर यांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांचा पराभव केला होता. संजय रायमुलकर यांना या निवडणुकीत 1 लाख 12 हजार 038 मते पडली होती. तर दुसऱ्या क्रमांकावरील अनंत वानखेडे यांना 49 हजार 836 मते मिळाली होती.