Marathwada MLA List Vidhansabha Election News : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपली आहे. यानंतर आता राज्यात पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीनं दौरे सुरु केले आहेत. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. मात्र, या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हा येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, मराठवाड्यात नेमकं कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला सत्ता मिळाली होती. मात्र, निकालानंतर राजकीय समीकरणं बदलली होती. राज्यात शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनं केलं होतं. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं. यामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर काही काळातच अजित पवार यांनी देखील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. ते देखील उपमुख्यमंत्री झाले.
मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे
दरम्यान, पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. 45 प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीच्या वाट्याला राज्यात फक्त 17 जागा आल्या होत्या. तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र असणार हा येणार काळच ठरवेल. पण सध्या मराठवाड्यात महायुतीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मनाबाद, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मराठवाड्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार?
औरंगाबाद/ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09 (Chhatrapati Sambhaji Nagar MLA List)
1) सिल्लोड विधानसभा - अब्दुल सत्तार (शिवसेना - एकनाथ शिंदे)
2) कन्नड विधानसभा - उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे)
3) फुलंब्री विधानसभा - हरिभाऊ बागडे (भाजप)
4) औरंगाबाद मध्य विधानसभा - प्रदीप जयस्वाल (शिवसेना - एकनाथ शिंदे)
5) औरंगाबाद पश्चिम विधानसभा - संजय शिरसाठ (शिवसेना - एकनाथ शिंदे)
6) औरंगाबाद पूर्व विधानसभा - अतुल सावे (भाजप)
7) पैठण विधानसभा - संदीपान भुमरे (शिवसेना - एकनाथ शिंदे) - सध्या खासदार
8) गंगापूर विधानसभा - प्रशांत बंब (भाजप)
9) वैजापूर विधानसभा - रमेश बोरनारे (शिवसेना - एकनाथ शिंदे)
बीड जिल्ह्यातील आमदार : 06 (Beed MLA List)
1) गेवराई विधानसभा - लक्ष्मण पवार (भाजप)
2) माजलगाव विधानसभा - प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी - अजित पवार)
3) बीड विधानसभा - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
4) आष्टी विधानसभा - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
5) केज विधानसभा - नमिता मुंदडा (भाजप)
6) परळी विधानसभा - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
लातूर जिल्ह्यातील आमदार : 06 (Latur MLA List)
1) लातूर ग्रामीण विधानसभा - धीरज देशमुख (काँग्रेस)
2) लातूर शहर विधानसभा - अमित देशमुख (काँग्रेस)
3) अहमदपूर विधानसभा - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
4) उदगीर विधानसभा - संजय बनसोडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
5) निलंगा विधानसभा - संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
6) औसा विधानसभा - अभिमन्यू पवार (भाजप)
उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील आमदार : 04 (Dharashiv MLA List)
1) उमरगा विधानसभा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना - एकनाथ शिंदे)
2) तुळजापूर विधानसभा - राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
3) उस्मानाबाद विधानसभा - कैलास पाटील (शिवसेना- उद्धव ठाकरे)
4) परांडा विधानसभा - तानाजी सावंत (शिवसेना - एकनाथ शिंदे)
जालना जिल्ह्यातील आमदार : 05 (Jalna MLA List)
1) परतूर विधानसभा - बबन लोणीकर (भाजप)
2) घनसावंगी विधानसभा - राजेश टोपे (राष्ट्रवादी - शरद पवार)
3) जालना विधानसभा - कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
4) बदनापूर विधानसभा - नारायण कुचे (भाजप)
5) भोकरदन विधानसभा - संतोष दानवे (भाजप)
नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09 (Nanded MLA List)
1) किनवट विधानसभा - भीमराव केरम (भाजप)
2) हदगाव विधानसभा - माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)
3) भोकर विधानसभा - अशोक चव्हाण (काँग्रेस)
4) नांदेड विधानसभा - उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
5) नांदेड विधानसभा - दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
6) लोहा विधानसभा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
7) नायगाव विधानसभा - राजेश पवार (भाजप)
8) देगलूर विधानसभा - जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
9) मुखेड विधानसभा - तुषार राठोड (भाजप)
हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03 (Hingoli MLA List)
1) वसमत विधानसभा - चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
2) कळमनुरी विधानसभा - संतोष बांगर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
3) हिंगोली विधानसभा - तानाजी मुटकुळे (भाजप)
परभणी जिल्ह्यातील आमदार : 04 (Parbhani MLA List)
1) जिंतूर विधानसभा - मेघना बोर्डीकर (भाजप)
2) परभणी विधानसभा - राहुल पाटील (शिवसेना - उद्धव ठाकरे)
3) गंगाखेड विधानसभा - रत्नाकर गुट्टे (रासप)
4) पाथरी विधानसभा - सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी