अँटिग्वा : भारतानं (Team India ) टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये  (Super 8) दुसरा विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma ) नेतृत्त्वातील टीम इंडियानं बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केलं. बांगलादेशनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 विकेटवर 196 धवा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना  बांगलादेश 8 विकेटवर 146  धावांपर्यंत मजल मारू शकलं. भारतानं अशा प्रकारे सुपर  8 मध्ये विजय मिळवला आहे. भारतानं त्यापूर्वी अफगाणिस्तानला देखील सुपर  8 मध्ये पराभूत केलं होतं. बांगलादेश विरुद्धच्या मॅचमधील विराट कोहलीच्या (Virat Kohli ) क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ देखील आयसीसीनं शेअर केला आहे. 



विराट कोहलीच्या व्हिडीओत नेमकं काय? 


आयसीसीनं विराट कोहलीचा एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यामध्ये विराट कोहली काय करतो, असं कॅप्शन आयसीसीनं दिलं होतं. अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर बांगलादेशच्या फलंदाजानं षटकार मारला होता.मैदानाबाहेर एका स्टेज खाली बॉल गेला होता. तो बॉल काझण्यासाठी विराट कोहली त्यास्टेज खाली जाऊन बॉल काढताना पाहायला मिळतो. विराट कोहलीनं त्यातून बॉल काढेपर्यंतचा व्हिडीओ पाहायला मिळतो. विराट कोहलीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. विराट कोहलीनं ज्या प्रकारे बॉल काढला ती पद्धत लहान मुलं क्रिकेट खेळताना वापरत असतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 


भारतानं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील पाचवी आणि सुपर 8 मध्ये दुसरा विजय मिळवला आहे. भारतानं आतापर्यंत आयरलँड, पाकिस्तान, अमेरिका यांना ग्रुप स्टेजमध्ये तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशला सुपर 8 च्या लढतीत पराभूत केलं आहे. 


पाहा व्हिडिओ







विराट कोहली फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण नेहमी दक्ष असतो. त्याच प्रकारे विराट कोहलीनं बाऊंड्री बाहेर गेलेला बॉल काढण्यासाठी स्टेज खाली जाण्याचा प्रयत्न केला.  विराटच्या या व्हिडीओला नेटकरी पसंत करत आहेत. 


भारत आणि ऑस्ट्रेलिया उद्या आमने सामने


भारत आणि ऑस्ट्रेलिया सुपर  8 मध्ये आमने सामने येणार आहेत. भारतानं अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत केलंय. तर, अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत उद्या होणार आहे. ही मॅच जिंकून वनडे वर्ल्ड कपमधील फायनलच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.  अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया देखील पलटवार करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करायचं असल्यास भारताला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या मोठ्या भागिदारीची गरज आहे. 


संबंधित बातम्या : 



T20 World Cup 2024: अफगाणिस्तानने लोळवलं, पण घमंड उतरला नाही; ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने थेट टीम इंडियाला डिवचलं!