Manoj Jarange Patil, जालना : "आमच्या शक्ती वरती लढता येतील, त्या मतदारसंघाची आम्ही सकाळपासून चर्चा केली. राज्यात पहिल्यांदा उमेदवारांना प्रत्यक्ष बोलून मतदारसंघ विचारले असतील. Sc,st जागेवर उमेदवार देणार नाही. जिथे उमेदवार देणार नाही, तिथं विरोधक असलेल्या पाडायचं. जिथे उभे करायचे नाही तिथे आपल्या विचाराच्या उमेदवाराला बॉण्ड आणि व्हिडिओ घेऊन त्याला पाठिंबा द्यायचा आहे. (तो व्हायरल करणार नाही)", असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवाय आज रात्रीत उमेदवारांची घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे म्हणाले, आपले मतदान जास्त असेल त्याच मतदारसंघ लढायचे आहेत. दलित -मुस्लिम सोबत आहेत. मात्र, जिथं आमची ताकद आहे, त्याच जागा लाजा लढणार आहोत. एका जिल्ह्यात एक किंवा दोन लढणार आणि बाकीच्या पाडणार आहोत. 15-20 जागा लढवणार, मुस्लिमांच्या दोन तीन , दलितांच्या दोन तीन असतील असा अंदाज आहे. अजून एक दोन किचकट प्रश्नांवर आमची चर्चा सुरू आहे. आमच्या गोरगरीब मुलांना. त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. आम्हाला राजकारण हवस म्हणून करायचे नाही. कोणीही बळच हट्ट करू नका.
लढवणार असलेले मतदारसंघ
बीड
मंठा
परतूर
फुलंब्री
पाथरी
हाथगाव
धाराशीव-कळंब
दौंड
पर्वती
पाथर्डी
कोपरगाव
शेवगाव
करमाळा
बाकीचे पाडायचे आहेत.
लढवायचा ठरवला परंतु उमेदवार निश्चित होणे बाकी
कन्नड
हिंगोली
वसमत
गंगाखेड
लोहा
कंधार
तुळजापूर
भूम-परांडा-वाशी
पाचोरा
माढा
धुळेश्वर
निफाड
नांदगाव
मनोज जरांगे म्हणाले, आपले मतदान जास्त असेल त्याच मतदारसंघ लढायचे आहेत. दलित -मुस्लिम सोबत आहेत. मात्र, जिथं आमची ताकद आहे, त्याच जागा लाजा लढणार आहोत. एका जिल्ह्यात एक किंवा दोन लढणार आणि बाकीच्या पाडणार आहोत. 15-20 जागा लढवणार, मुस्लिमांच्या दोन तीन , दलितांच्या दोन तीन असतील असा अंदाज आहे. अजून एक दोन किचकट प्रश्नांवर आमची चर्चा सुरू आहे. आमच्या गोरगरीब मुलांना. त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. आम्हाला राजकारण हवस म्हणून करायचे नाही. कोणीही बळच हट्ट करू नका.
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले, सत्ताधाऱ्यांना मी सोडणार नाही, समाजाला संपवणाऱ्याना संपवणार आहोत. मी बदला घेणार, मी नेत्या सारखं भेसळ जगणर नाही. माझं कुटुंब सुद्ध मला माहिती नाही, माझं मुल, माझा बाप कुठं आहे,हे मला माहिती सुध्दा नाही. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला सोडणार नाही. यांना पायाखाली तुडवा, कोण कोणाचा नेता आणि नाही. दलित मुस्लिम मराठा समीकरण झाले आहे. उद्या त्यांचे मतदारसंघ ते आम्हाला देतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Manoj Jarange: मनोज जरांगेंचं मिशन मुंबई, 23 मतदारसंघांबाबत मोठा निर्णय; पाडणार की लढणार ठरलं