Manoj Jarange Patil, जालना : "आम्हाला स्वत:च्या शक्तीवरती लढायचे आहेत, त्या मतदारसंघाची सकाळपासून चर्चा केली आहे. राज्यात पहिल्यांदा असं झालं असेल की, प्रत्यक्ष लोकांना, उमेदवारांना समोर घेऊन मतदारसंघ विचारला जातोय. पक्षाच्या कार्यालयातून नाव येत आणि त्याला घरी आल्यानंतर नाव आणि मतदारसंघ समजतो. लोकशाहीप्रमाणे, शिवाजी महाराजांच्या विचाराने लोकांना सन्मान देण्याचं काम करत आहोत. आम्ही मराठ्यांच्या मतावरती निवडून येतील, तिथेच उमेदवार देणार आहोत. एस्सी, एसटीच्या जागांवर अतिक्रमण करणार नाहीत. जिथे उमेदवार देणार नाही, तिथं विरोधक असलेल्या पाडायचं. जिथे उभे करायचे नाही तिथे आपल्या विचाराच्या उमेदवाराला बॉण्ड आणि व्हिडिओ घेऊन त्याला पाठिंबा द्यायचा आहे. (तो व्हायरल करणार नाही)", असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते अतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जरांगे पाटील, समाजाला सांगताना सांगितलं आहे की, जिथे आपलं मतदान जास्त आहे , तिथंच लढायचं. दलित मुस्लिम सोबत असतानाही जिथे शक्ती आहे, तिथेच लढतोय. पराभव होऊन समाजाचा अपमान होणे योग्य नाही. ज्या लढणार नाही, तिथे पाडून टाकायचं आहे. आमचे मित्र पक्ष दलित आणि मुस्लिमांच्या दोन दोन जागा असतील, असा अंदाज आहे. आमचं कालही बोलणं झालं, आजही बोलणं झालं. दुपारीही बैठक झाली. अजूनही चर्चा सुरु आहे. काही किचकट प्रश्नांवर चर्चा सुरु आहे. समाजाची अपेक्षा होती, उमेदवार दिली पाहिजेत.
लढवणार असलेले मतदारसंघ
बीड
मंठा
परतूर
फुलंब्री
पाथरी
हाथगाव
धाराशीव-कळंब
दौंड
पर्वती
पाथर्डी
कोपरगाव
शेवगाव
करमाळा
बाकीचे पाडायचे आहेत.
लढवायचा ठरवला परंतु उमेदवार निश्चित होणे बाकी
कन्नड
हिंगोली
वसमत
गंगाखेड
लोहा
कंधार
तुळजापूर
भूम-परांडा-वाशी
पाचोरा
माढा
धुळेश्वर
निफाड
नांदगाव
मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आज रात्रीच मतदारसंघ आणि उमेदवार आम्ही जाहीर करणार आहोत. जर रात्रीतून नाही झालं तर सकाळी 7 च्या आत उमेदवार जाहीर करावे लागतील. कारण अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे. राज्यभरातील मतदारसंघातील उमेदवाराना विनंती आहे की, तुमच्या मतदारसंघाचे नाव आलं नाही, तर अर्ज माघं घ्या. गोरगरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर त्रास दिला तर दलित मुस्लिम आणि मराठा मिळून लढणार आहोत. तुम्ही आमच्या उमेदवाराला त्रास दिला, तर तुमच्या पक्षातील सर्व उमेदवार आम्ही पाडणार आहोत. आम्ही मतदानातून ताकद दाखवणार आहेत. आमच्या उमेदवारांना त्रास दिला तर दुसऱ्या जिल्ह्यात तुमचे उमेदवार पाडणार आहोत. लोकांचे हक्काचे लोक असावेत म्हणून आम्ही उमेदवार देत आहोत. दलित, मुस्लिमांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा लिंगायत, वारकरी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोक आम्हाला पाठवायचे आहेत. कर्माचाऱ्यांचा आवाज म्हणून लोक पाठवायचे आहेत. आम्हाला आमचे लोक लोकांना न्याय देण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहेत. मराठ्यांच्या जीवावर लोक उभं करायचे आहेत. जिल्ह्यातल्या मतदारसंघात उमेदवार द्या, असा हट्ट करु नका. एका जातीवर निवडणूक लढणे सोपे नाही. हट्ट धरुन मागणी करु नका. समाज खिंडीत सापडेल, असा हट्ट धरु नका.
गुलाल अंगावर पडला तर समाज मान ताठ करुन फिरेल. त्यामुळे निवडून येणारेच मतदारसंघ लढणार आहोत. लाखो मतदान पडणार असेल तरच लढायचं आहे. समाजाला खड्ड्यात घातलं तर समाज माफ करणार नाही. शेकडो मुलांचे जीव गेले आहेत. अंतरवालीत बांधवांचे रक्त सांडले आहे. समाज सैरावैरा पडण्याचे वेळ आली आहे. नवी पिढी निर्माण करायची आहे, जी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मागे उभे राहिल. मतदारसंघासाठी तुमचे हट्ट असतील, तर तुम्ही चूक करत आहोत. मराठा समाजाचं सीट पडलं तर लोक हसतील. हक्काचे 5-10 आमदार झाले तर हक्काचे होतील.
मला काही माज आणि मस्ती नाही राजकारण्यात जायची. समाजाला अग्निकुंडात जायची गरज नाही. सरकार आपल्याला हिन वागणूक देत असेल. दुसऱ्यांना आरक्षण देऊन आपल्याला नाकावर टिच्चून दुसऱ्या देणार असतील तर जागे राहा. आपल्या आयुष्याला राजकारण नव्हतं. तुम्ही पाडून लोकांना ताकद दाखवली आहे. माझा मतदारसंघ आहे, माझा उमेदवार म्हणून सर्व उमेदवारांना सहकार्य करा. सट्ट्या टाकून उमेदवार जिंकून आणा. माझ्यासारखा तळमळ करणारा भेटणार नाही.
मी आजवर कोणालाच पाठिंबा दिलेला नाही, कोण्या अपक्षाला दिलेला नाही. जो कोणी पाठिंब्याच्या क्लिप व्हायरल करेल त्याला अगोदर पाडा. आज जाहीर न झालेल्या मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्या. आज रात्री उशिरा शक्यतो सकाळी लवकर उमेदवारांची घोषणा होईल.
फडणवीस आणि भुजबळ यांच्या विरोधात उमेदवार देणार का?
मनोज जरांगे म्हणाले, वेळेवरती सगळे होईल, पुढे कळेल. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला सोडणार नाही. जिथे उमेदवार दिले तिथे निवडून आणणार आहोत. दलित मुस्लिम मराठा समीकरण झाले आहे,उद्या त्यांचे मतदारसंघ ते आम्हाला देतील. सत्ताधाऱ्यांना मी सोडणार नाही, समाजाला संपवणाऱ्याना संपवणार आहोत. (भावनिक, जरांगे क्या डोळ्यात अश्रू) मी बदला घेणार, मी नेत्या सारखं भेसळ जगणार नाही. माझं कुटुंब सुद्धा मला माहिती नाही, माझं मुल, माझा बाप कुठ आहे हे मला माहिती सुध्दा नाही. माझ्या समाजाला त्रास देणाऱ्याला सोडणार नाही. यांना पायाखाली तुडवा, कोण कोणाचा नेता आणि नाही. एवढ्यात वेळेस समाजाचे व्हा.दलित मुस्लिम मराठा समीकरण झाले आहे,उद्या त्यांचे मतदारसंघ ते आम्हाला देतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या