Manipur Phase 1 Polling : मणिपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मणिपूरमध्ये मतदानला सुरुवात झाली आहे. एकूण 38 जागांसाठी आज मतदान होत आहे. आत्तापर्यंत मणिपूरमध्ये 27.34 टक्के मतदान झाले आहे. तर या मतदानावेळी चुराचांदपूर जिल्ह्यात राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिलत आहे. या वादात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खराब झाले, ते दुरुस्त करण्याचे काम सुरु असून, लवकरच मतदान चालू होणार आहे.
एकूण सहा जिल्ह्यामधील 38 जागांसाठी मतदान पार पडत आहे. दरम्यान, आज चार वाजेपर्यंतच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चार वाजल्याच्या नंतर मतदान करता येणार नाही. तीन ते चार या वेळात कोरोना झालेल्या रुग्णांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या 5 मार्चला पार पडणार आहे. तर या सर्व जागांचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यन, आज मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पर पडणार आहे. यामधील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज मणिपूरमध्ये 38 जागांवर मतदान होणार असून, यामध्ये 15 महिला उमेदवारांसह 173 उमेदवारांचे भवितव्य राज्यातील मतदार ठरवणार आहेत. पहिल्या टप्प्यात 6 लाख 29 हजार 276 महिला मतदारांसह 12 लाख 22 हजार 713 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज 15 महिलांसह 173 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचार्यांचा मोठा ताफा सर्व 38 विधानसभा मतदारसंघात तैनात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: