Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सध्या मतमोजणी (West Bengal Election Result 2026) सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भाजप 193 आणि तृणमूल काँग्रेसने 94 जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित होत असताना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026)
भवानीपूर मतदारसंघातील टीएमसीच्या उमेदवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नये. हा भाजपचा डाव आहे. मी कालपासूनच हे सांगत आहे की, सुरुवातीला त्यांनाच आघाडीवर असल्याचे दाखवले जाईल. त्यांनी अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवली आहे. कल्याणी येथे अशा काही मशीन्स आढळल्या आहेत, ज्यांमधील आकडेवारी जुळत नाही. केंद्रीय दलांच्या माध्यमातून सर्व बाजूंनी टीएमसीवर दबाव आणले केले जात आहेत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
निराश होण्याची काहीच गरज नाही; सूर्यास्तानंतर तुमचाच विजय- ममता बॅनर्जी (Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026)
'SIR' (निवडणूक यंत्रणा) च्या माध्यमातून त्यांनी मते चोरण्याचा प्रयत्न केला, तरीही सध्या आम्ही 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहोत. ज्याची मात्र कुठेही नोंद घेतली जात नाहीये. सर्व काही चुकीच्या पद्धतीनेच प्रसिद्ध केले जात आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे आपल्या मर्जीनुसार काम करत आहे आणि केंद्रीय दलेही त्यांनाच साथ देत आहेत. स्थानिक पोलीसही केंद्रीय दलांच्याच सोबतीने काम करत आहेत. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगते की, निराश होण्याची काहीच गरज नाही; सूर्यास्तानंतर तुमचाच विजय होईल. मतमोजणीच्या केवळ 2-4 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, ही प्रक्रिया 14 ते 18 फेऱ्यांपर्यंत चालते आणि अंतिमतः आपलाच विजय होईल. कुणीही घाबरण्याचे काहीच कारण नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
प.बंगालच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये- (West Bengal Election Result 2026)
- भाजपकडून आणखी एक राज्य प्रथमच पादाक्रांत
- ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता भाजपनं उलथवली
- 10 वर्षातच भाजपची 3 वरुन जवळपास 200 जागांवर मजल
- 2021 च्या तुलनेत भाजपची मतांची टक्केवारी 38.15% वरुन 44.77%
- तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत 48.02% वरुन 41.52% पर्यंत घट
