Election Result 2026: देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांसह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार कोणत्या राज्यात कोणता पक्ष आघाडीवर आहे, जाणून घ्या....(assam west bengal tamil nadu kerala puducherry election result 2026)
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार पश्चिम बंगालमध्ये कोण आघाडीवर? (West Bengal Election Results 2026)
सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमधून येत आहेत. एकूण 293 जागांपैकी 245 जागांचे कल हाती आले असून भाजपने 142 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) 99 जागांवर खाली घसरली आहे. डावे आणि काँग्रेसची पाटी यंदाही कोरीच राहण्याची शक्यता दिसत आहे.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार तामिळनाडूमध्ये कोण आघाडीवर? (Tamil Nadu Election Results 2026)
तामिळनाडूमध्ये 234 पैकी 213 जागांचे कल समोर आले आहेत. येथे अण्णा द्रमुक (ADMK+) 93 जागांसह आघाडीवर आहे, तर द्रमुक (DMK+) 68 जागांवर आहे. विशेष म्हणजे, विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाला अद्याप खाते उघडता आलेले नाही. येथे अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार आसाममध्ये कोण आघाडीवर? (Assam Election Results 2026)
आसाममध्ये भाजपने पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केली आहे. 136 पैकी 112 जागांच्या कलानुसार भाजप आघाडी 83 जागांवर पुढे आहे, तर काँग्रेस आघाडीला केवळ 27 जागा मिळाल्या आहेत. येथे भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार केरळमध्ये कोण आघाडीवर? (Kerala Election Results 2026)
केरळमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. 140 जागांच्या निकालात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF/CONG+) 98 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी डाव्या आघाडीला (LDF) केवळ 38 जागांवर समाधान मानावे लागत आहे. केरळच्या जनतेने दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली परंपरा कायम ठेवल्याचे दिसत आहे.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार पुद्दुचेरीमध्ये कोण आघाडीवर? (Puducherry Election Results 2026)
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये 33 पैकी 29 जागांचे कल हाती आले असून, भाजप आघाडी 22 जागांसह सत्तेच्या जवळ आहे. काँग्रेसला येथे केवळ 6 जागांवर आघाडी मिळाली आहे.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार बारामतीमध्ये कोण आघाडीवर? (Baramati By Election Result 2026)
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी घेतली असून, त्या केवळ राज्यातच नव्हे तर देशातील विजयाचे सर्व विक्रम मोडणार का? याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते.पहिल्या फेरीच्या निकालानंतर सुनेत्रा पवार 6,500 मतांनी आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आला असून सुनेत्रा पवारांनी ही आघाडी वाढवत 16,543 मतांपर्यंत नेली आहे. 36377 मतांनी चौथ्या फेरीत अखेर सुनेत्रा पवार आघाडीवर आहे.
सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार राहुरीमध्ये कोण आघाडीवर? (Rahuri By Election Result 2026)
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. पाचव्या फेरीचा निकाल हाती आला असून कर्डिले यांनी तब्बल 21886 मतांची भक्कम आघाडी घेतली आहे.
पाचव्या फेरीअखेरची आकडेवारी:
अक्षय कर्डिले (भाजप): 24408मते
गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस - SP): 2522 मते
रावसाहेब खेवरे (अपक्ष): 1603३ मते
संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी): 1438 मते
