मुंबई : निवडणूक म्हटलं की सर्वसामान्यांचे प्रश्न, प्रलंबित प्रश्नावर नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, कोणता पक्ष या समस्या सोडवू शकतो,असे अनेक मुद्दे चर्चिले जातात. या मुद्द्यांचा आधार घेत, एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे.


ओपिनियन पोलमध्ये उद्योग आणि नोकऱ्या हा मुद्दा सर्वसामन्यांना जिव्हाळ्याचा वाटतोय. महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता? या प्रश्नावर सर्वाधिक 23.1 टक्के लोकांनी उद्योग आणि नोकऱ्या हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. तर त्यापाठोपाठ पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे, असं 18.4 टक्के लोकांना वाटतं.


लोकांनी या समस्यांना राज्य सरकारला 22.5 टक्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 टक्के तर केंद्र सरकारला 11.6 टक्के लोकांनी जबाबदार धरलं आहे. या सर्व समस्या भाजप सोडवू शकेल, असं 28.9 टक्के लोकांना वाटत आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.


महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता?




  • पाणी पुरवठा 18.4 टक्के

  • उद्योग आणि नोकऱ्या 23.1 टक्के

  • शेतीचे प्रश्न 13.8 टक्के

  • रस्ते 14.1 टक्के

  • महागाई 4.1 टक्के

  • इतर 26.5 टक्के


महाराष्ट्रातल्या सध्याच्या समस्यांना जबाबदार कोण?




  • राज्य सरकार 22.5 टक्के

  • मुख्यमंत्री 10 टक्के

  • केंद्र सरकार 11.6 टक्के

  • पंतप्रधान मोदी 5.1 टक्के

  • आमदार, खासदार 10.8 टक्के

  • इतर 40 टक्के


राज्यातल्या समस्या कोणता पक्ष सोडवू शकेल?




  • भाजप 28.9 टक्के

  • शिवसेना 6.6 टक्के

  • काँग्रेस 13.9 टक्के

  • राष्ट्रवादी 11.7 टक्के

  • मनसे 2 टक्के

  • कुणीच नाही 14.8 टक्के

  • सांगता येत नाही 18.8 टक्के

  • इतर 3.3 टक्के


एबीपी माझासाठी सी-वोटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व 288 मतदारसंघातील 19,489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबरदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. एबीपी माझा सी-वोटर या जनमत चाचणीचे अंदाज दैनंदिन ट्रॅकिंग पोल पद्धतीने गेल्या सात दिवसातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांशी चर्चा करुन काढले आहेत. सी-वोटरने या जनमत चाचणीसाठी राज्यातील सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा केली. या जनमत चाचणीच्या अंदाजातील मार्जिन ऑफ एरर मॅक्रो लेवलवर +/- 3% तर मायक्रो लेवलवर +/- 5% आहे.