Amit Thackeray vs Sada Sarvankar: माहीम विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीमध्ये महेश सावंत विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: अमित ठाकरे यांना आखाड्यात उतरवणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Mahim Vidhan Sabha: 17 फेरी अखेर माहीम विधानसभा मतदारसंघात महेश सावंत 985 मतांनी आघाडीवर
आता शेवटची फेरी बाकी आहे...
Mahim Vidhan Sabha: माहीम विधानसभा 15वी फेरी
उबाठा- महेश सावंत- 40828
शिवसेना- सदा सरवणकर- 39649
मनसे- अमित ठाकरे- 27324
माहिममध्ये 9 व्या फेरी अखेर महेश सावंत 7 हजारांच्या मतांनी आघाडीवर
माहिममध्ये सहाव्या फेरीनंतरही महेश सावंत मोठ्या आघाडीवर
महेश सावंत १२ हजारांपेक्षा जास्त मतांनी पुढे
अमित ठाकरे तिस-या नंबर
Amit Thackeray Mahesh Sawant: माहीममध्ये मनसेला मोठा धक्का बसला असून अमित ठाकरे पिछाडीवर गेले आहेत. सध्या ठाकरेंचे महेश सावंत आघाडीवर असून सदा सरवणकर दुसऱ्या स्थानी आहेत. तर, अमित ठाकरे तिसऱ्या स्थानी आहेत.
तिस-या फेरी अखेर महेश सावंत आघाडीवर
मनसे - अमित ठाकरे : 4693 मतं
ठाकरे गट-महेश सावंत : 8863 मतं
शिवसेना शिंदे गट - सदा सरवणकर : 6202 मतं
Mahim Vidhan Sabha Election Result 2024: माहीम विधानसभेमध्ये महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे. अमित ठाकरे सुरुवातीच्या कलानूसार आघाडीवर होते. मात्र आता महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे.
(Mahim Vidhan Sabha Election Result 2024: माहीम विधानसभा मतदारसंघातून (Mahim Vidhan Sabha Election Result 2024) अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आतार्यंत माहीम विधानसभा चर्चेत आहे. विधानसभेच्या निकालाआधी अनेकांनी माहीममधून विद्यामान आमदार सदा सरवणकर पुन्हा बाजी मारतील, असा अंदाज वर्तवला होता. तसेच एक्झिट पोलनूसार देखील मनसेला चांगलं यश मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु माहीममील सुरुवातीच्या कलांमध्येच अमित ठाकरेंनी बाजी मारली.
Amit Thackeray Sada Sarvankar Mahesh Sawant: काल रात्री पर्यंत लोकांची काम करत होतो. आता पुन्हा कामे करायची आहे. जनतेचा कौल माझ्या बाजूने असणार आहे. दोन तासात जनतेचा कौल समजेल. जो पर्यंत निकाल स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने मला मदत केली, असा गौप्यस्फोट देखील महेश सावंत यांनी केला.
Amit Thackeray Sada Sarvankar Mahesh Sawant: 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात 52.67 टक्के मतदान झाले होते. आता 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत माहीममध्ये 58 टक्के मतदान झालं आहे. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये माहीममधील मतदानाचा टक्का 5.33 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे माहीममध्ये यंदा वाढलेला हा मतदानाचा टक्का कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Amit Thackeray Sada Sarvankar Mahesh Sawant: माहीममधील सुरुवातीच्या कलानूसार अमित ठाकरे आघाडीवर आहेत.
Amit Thackeray: माहीम विधानसभा मतदारसंघात पोस्ट मतमोजणीला सुरुवात
Amit Thackeray vs Sada Sarvankar गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. माहीम विधानसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) निवडणुकी लढवत आहेत.
पार्श्वभूमी
Mahim Vidhan Sabha Election 2024 मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघामधून मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना आखाड्यात उतरवणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माहीतमधील तिहेरी लढतीत शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महेश सावंत यांचं (Mahesh Sawant) आव्हान असणार आहे. त्यामुळे माहीम विधानसभेत अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -