Maharshtra Lok Sabha Election 2024 : सुरुवातीच्या कलामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. महायुती 22 आणि महाविकास आघाडीचे 22 उमेदवार आघाडीवर आहेत. उस्मानाबादमध्ये उद्धव ठाकरेंचे ओमराजे निंबाळकर (prakash Rajenimbalkar) यांना मोठी आघाडी मिळाली आहे. ओमराजे निंबाळकर यांना पहिल्या फेरीमध्ये 12 हजार 774 मते पडली आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील या मैदानात आहेत. पहिल्या फेरीअखेर अर्चना पाटील पिछाडीवर आहेत. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदान ?

मतदारसंघ

आमदार  

मतदान टक्केवारी

बार्शी राजेंद्र राऊत   65.28 टक्के
तुळजापूर राणा जगजितसिंह पाटील  65.40
भूम-परांडा-वाशी तानाजी सावंत  63.54
उमरगा ज्ञानराज चौघुले  60.29
औसा अभिमन्यू पवार  64.44
धाराशिव-कळंब कैलास पाटील  63.97

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. तर, महायुतीच्या उमेदवार बनून अर्चना पाटील मैदानात उतरल्या. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी येथील मतदारसंघात उत्साही मतदान झालं. 6 विधानसभा मतदारसंघ असलेल्या धाराशिव लोकसभेसाठी 63.88 टक्के मतदान झाले. गत 2019 च्या तुलनेत ही टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं. वाढलेल्या टक्केवारीचा थेट फायदा ओमराजे यांनाच झाल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानेही लक्ष वेधले होते.  त्यामुळे, वंचितचे भाऊसाहेब आंधळकर ह्यांच्या मतांकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. 

बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर 

बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजप उमेदवार पंकजा मुंडे पिछाडीवर पडताना दिसत आहेत. सुरुवातीच्या 9 वाजेपर्यंतच्या कलानुसार बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता. सुरुवातीच्या कलामध्ये बजरंग सोनवणे यांनी पाच हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे.

पहिल्या फेरीचे कल, कोण कोण आघाडीवर

सुप्रिया सुळे - बारामती
अमोल कोल्हे - शिरुर
रवींद्र धंगेकर - पुणे
शाहू महाराज - कोल्हापूर 
सत्यजीत पाटील - हातकणंगले 
राजाभाऊ वाजे - नाशिक
राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई
यामिनी जाधव - दक्षिण मुंबई