Tasgaon Kavathe Mahankal Vidhansabha Election Result 2024 : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा (Tasgaon Kavathe Mahankal Vidhansabha) मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई होती. मात्र, इथून शरद पवार गटाचे रोहित पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी अजित पवार गटाच्या संजयकाका पाटील यांचा पराभव केला आहे. अजित पवार गटाने रोहित पाटील यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र, तासगाव कवठेमहांकाळच्या जनतेनु रोहित पाटलांच्या बाजूनचे कौल दिला आहे. त्यामुळं पाटील परिवाराचा बालेकिल्ला कायम राहिला आहे. राज्यातील मोठ्या लढतीपैंकी ही एक लढत मानली जात होती.
सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा (Tasgaon Kavathe Mahankal Vidhansabha) मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई होत आहे. या मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील ( Rohit Patil) हे शरद पवार गटाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात अजित पवारांनी भाजपच्या संजयकाका पाटील (sanjaykaka patil) यांना पक्षात घेऊन तिकिट दिलं. या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे. कारण राज्यातील सर्वात मोठ्या लढतींपैकी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची एक लढत मानली जातेय. सुरुवातीच काही कल हाती आलेत, यानुसार शरद पवार गटाचे रोहित पाटील आघाडीवर आहेत. तर संजयकाका पाटील हे पिछाडीवर आहेत.
सुमनताई पाटील या दोन वेळा आमदार
आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील या दोन वेळा आमदार राहिल्या. त्यांच्या मुलाने म्हणजे रोहित पाटलांनी वयाची पंचविशी पूर्ण केल्यानंतर आमदारकीची तयारी सुरू केली होती. स्वतः शरद पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर दुसरीकडे कवठेमहांकाळचे नेते अजितराव घोरपडे यांनी संजयकाकाना पाठिंबा दिला होता. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आर आर पाटलांनी झेडपी ते आमदार आणि नंतर मंत्री अशी झेप घेतली. त्यांचाच वारसा आता रोहित पाटील चालवत असून त्यांचीही नाळ सर्वसामान्यांसोबत जुळल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे आर आर पाटील यांचे पारंपरिक विरोधक संजयकाका पाटील हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्यामागे भाजपची ताकद, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद उभी आहे.
महत्वाच्या बातम्या: