Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) बहुतांश ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. या निकालानुसार महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं आहे. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील या निवडणुकीत मोठं अपयश आलं आहे. मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. या सर्व निवडणूक निकालावर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.
अमित ठाकरेंचा माहिममधून पराभव
या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, .या मतदारसंघात अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. इथून शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले आहे. तसेच सदा सरवणकर यांचा देखील पराभव झाला आहे. तसेच दुसऱ्या अनेक ठिकाणी मनसेने उमेदनवार उभे केले होते. मात्र, या सर्व ठिकाणी मनसेचा पराभव झाला होता.
दरम्यान, हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या महायुतीला मोठं यश मिळालं आहे. 230 च्या पुढे जागा महायुतीला मिळाल्या आहेत. यामध्ये भाजप 130 जागांच्या आसपास जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गट 56 तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण महाविकास महाविकास घाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसा आहे. भाजपला आजपर्यंतचं सर्वातं मोठं यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: