Radhanagari Vidhan Sabha : राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रकाश आबिटकर यांनी हॅट्ट्रिक केली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघातून एखाद्या आमदाराने हॅट्रिक करण्याची किमया केली आहे. माजी आमदार के पी पाटील यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. प्रकाश आबिटकर शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून केपी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पाटील आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा सामना रंगला होता. यापूर्वी झालेल्या बद्री साखर कारखाने निवडणुकीमध्ये केपी पाटील आणि प्रकाश आबिटकर आमने सामने आले होते. मात्र, के पी पाटील यांनी एकहाती कारखाना कारखान्याची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये कोण कोणाचा काटा काढणार? याकडे लक्ष होते. मात्र, प्रकाश आंबिटकर यांनी आमदारकीमध्ये बाजी मारली आहे.
राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये
या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची पहिली सभा घेतली होती. गद्दाराला पराभूत करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र, प्रकाश आंबिटकर विजयी होण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत. आबिटकर यांची मतदारसंघातील विकास कामे त्यांच्यासाठी निर्णय ठरली आहेत. या मतदारसंघांमध्ये केपी पाटील यांचे मेहुणे ए वाय पाटील यांनी सुद्धा बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा कोणाला फटका बसणार? याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांच्या बंडखोरीचा फारसा प्रभाव या दोघांवर झालेला दिसून येत नाही. प्रकाश आबिटकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदारकी पटकावली आहे. राज्यात महायुती सत्तेत असल्याने आबिटकर मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या प्रचार दौऱ्यामध्ये याबाबत सुतवत केले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांच्या विरोधात विजय खेचून आणला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर आणि प्रकाश आबिटकर मंत्रीपदाच्या शर्यतीत असणार आहेत.
केपी पाटलांची जबाबदारी सतेज पाटलांकडे
दिवाळी पार पडताच उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेत कोल्हापुरात प्रचाराचा नारळ फोडला होता. आदमापुरात झालेल्या विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी केपी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी जाहीरपणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर दिली होती. माजी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सुद्धा काँग्रेस प्रवेश केला होता. त्यामुळे गटातटाचे राजकारण पाहता आणि सतेज पाटलांची निर्णायक ताकद पाहता केपी पाटील पुन्हा एकदा गड काबीज करतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आबिटकर यांनी विकासकामे आणि केपींच्या दलबदलू भूमिकेला छेद विजय खेचून आणला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या