भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. यामध्ये काशीराम पावरा (शिरपूर मतदारसंघ), डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी (रामटेक मतदारसंघ), परीणय फुके (साकोळी मतदारसंघ), रमेशसिंह ठाकूर (मालाड पश्चिम मतदारसंघ) यांचा समावेश आहे.
भाजपने पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश होता. तर तिसऱ्या यादीत चार उमेदवार घोषित केले आहेत. तिन्ही याद्या मिळून भाजपकडून आतापर्यंत 143 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार भारतीय जनता पक्ष राज्यात 146 जागा लढवणार आहे. त्यामुळे आता केवळ 3 जागा जाहीर करणं बाकी आहे. त्यामुळे चौथ्या यादीत खडसे, तावडे, बावनकुळे, राज पुरोहित, प्रकाश मेहता, नितेश राणे, बाळासाहेब सानप यांच्यापैकी कोणाचं नाव असणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. (एकनाथ खडसे यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली जाणार नाही. त्यामुळे एकनाथ खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत.)