Maharashtra Vidhansabha Election 2024 मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election 2024) भाजपने पहिल्या यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या यादीत मुंबईतील 13 विद्यामान आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे मोठे बंधू विनोद शेलार (Vinod Shelar) यांना देखील मालाड पश्चिम (Malad West Assembly Constituency) येथून उमेदवारी देण्यात आली आहे. 


भाजपने मालाड पश्चिम येथून विधानसभेसाठी संधी दिल्यानंतर विनोद शेलार यांनी आभार व्यक्त केले आहे. मालाड पश्चिम मतदारसंघातून माझी उमेदवारी घोषित करुन तेथील जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आभारी आहे. भाजपचे पदाधिकारी आणि लाखमोलाच्या कार्यकर्त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. मालाड पश्चिम मतदारसंघाचा आणि जनतेचा सर्वागीण विकास हेच माझे लक्ष्य असून ते साध्य करण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असा मी शब्द देतो, असं विनोद शेलार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले. 


कोण आहे विनोद शेलार?


विनोद शेलार भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांचे मोठे बंधू आहेत. 2012 ते 2017 मध्ये नगरसेवकपद भूषवणारे विनोद शेलार पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवणार आहे. विनोद शेलार यांचे 2019 मध्ये नाव येथे चर्चेत होते, मात्र काँग्रेसचे माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना मालाड पश्चिममधून पक्षाने तिकीट दिले. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. गेली 10 वर्षे विनोद शेलार यांनी हा मतदार संघ बांधला आहे. त्यांचे काम पाहून पक्षांने यंदा त्यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे. विनोद शेलार यांना 2009 पासून सलग तीन वेळा मालाड पश्चिमचे विद्यमान काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांना विनोद शेलार यांचे यंदा मात्र कडवे आव्हान असेल.


भाजपची मुंबईतील 14 उमेदवारांची नावं-


1) मुलुंड - मिहिर कोटेचा 
2) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर 
3) चारकोप - योगेश सागर 
4) मालाड पश्चिम - विनोद शेलार 
5) गोरेगाव - विद्या ठाकूर 
6) अंधेरी पश्चिम - अमित साटम 
7) विलेपार्ले - पराग अळवणी 
8) घाटकोपर पश्चिम - राम कदम 
9) वांद्रे पश्चिम- आशिष शेलार 
10) सायन कोळीवाडा - तमिल सेल्वन 
11) वडाळा - कालिदास कोळंबकर 
12) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
13) कुलाबा- राहुल नार्वेकर
14) दहिसर - मनिषा चौधरी


संबंधित बातमी:


Maharashtra Vidhansabha Election 2024: मुंबई, ठाणे ते रायगड, सिंधुदुर्गपर्यंत...; कोणाचं पारडं भारी?, विधानसभा निवडणुकीआधी सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर