Nawab Malik : मी निवडणुकीवर ठाम आहे. मी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून (Mankhurd Shivajinagar vidhansabha) निवडणूक लढणार असल्याची भूमिका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जाहीर केली. अजित पवार आणि प्रफुल पटेल यांनी नुकतीच नवाब मलिक यांची भेट घेतली होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे नवाब मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध होत आहे.


 राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र नवाब मलिक हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नवाब मलिका यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.


नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं आहे. मात्र मुलीला तिकीट मिळाल्यानंतर देखील नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, 29 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांना संधी


नवाब मलिकांना भाजपचा आक्षेप आहे आणि विरोधकही टीकेचे बाण सोडतायत. या पार्श्वभूमीवर दादांनी नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांना संधी दिली आहे.  विधानसभेच्या निवडणुका हाकेच्या अंतरावर आहेत.  नवाब मलिक ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतात तिथं मुस्लिम मत ही निर्णायक ठकणार आहेत. त्यामुळे त्यांना अडगळीत टाकणं हे अजितदादांना आणि पर्यायानं महायुतीला देखील परवडणारं नाही अशी माहिती राजकीय तज्ज्ञांनी ासंगितली आहे. याच बेरजेच्या राजकारणात नवाब मलिकांना जवळ करण्याचं गणित दडल्याची चर्चा आहे. 


भाजपचा नवाब मलिकांना विरोध का?


भाजपने नवाब मलिकांवर देशद्रोह्यांशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत.  मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक तुरुंगात होते. आता ते जामीनावर बाहेर आहेत.  मलिकांच्या उपस्थितीवर भाजपचा आक्षेप आहे. 


महत्वाच्या बातम्या: