Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabah Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोरी केलेले लोक आमचेचं आहेत. त्यांची समजूत काढण्यात आम्हाला नक्की यश येईल असा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. आज फडणवीस भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयात पोहोचले आले होते. या ठिकाणी त्यांनी भाजपचे कार्यालयीन कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेत दिवाळी फराळ घेतला.
भाजप हा संघटनेच्या आधारावर, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही सगळे कार्यकर्ते विदर्भ विभागीय कार्यालयात येतो. इथं एकत्र दिवाळी फराळ घेतो असे फडणवीस म्हणाले. भाजप हा पक्ष संघटनेच्या आधारावर, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. संघटना आणि कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे. तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, बंडखोरी केलेले लोक आमचेचं आहेत. त्यांची समजूनत काढणं आमचं कर्तव्य असल्याचे फडणवीस म्हणाले. रोष मोठा असतो पण पक्षाचं व्यापक हित ठेऊन अनेकांनी माघार घेण्याची मानसिकता झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची मोठी गर्दी
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच पेटल्यांच चित्र पाहायला मिळत आहे. ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे. ही बंडखोरी महाविकास आघाडीसह महायुतीत देखील आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळं नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख होती. तर 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. त्यामुळं कोणते उमेदवार निवडणूक लढवणार आणि कोणते उमेदवार निवडणूक लढवणार नाहीत, हे सगळं चित्र येत्या 4 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. त्यामुळं कोण कोणाविरुद्ध लढणार हे आपल्याला 4 नोव्हेंबरलाच समजणार आहे. दरम्यान, राज्याते उपमुख्.मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही बंडखोरांनी शांत करण्यात यशस्वी होऊ. त्यांची समजून काढणं आमचं काम असल्याचे फडणवीस म्हणाले.