Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काल लागला. यात जनतेने महायुतीला (Mahayuti) एक हाती सत्ता दिली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार धक्का दिला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) राज्यातील निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. कारण भारत जोडो यात्रा गेलेल्या एकाही मतदार संघात काँग्रेस (Congress) उमेदवाराचा विजय झालेला नाही.


07 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी 'भारत जोडो यात्रा' काढली होती. दरम्यान ही 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्ह्यातून व अकरा विधानसभा मतदारसंघातून गेली होती. मात्र ज्या ज्या विधानसभा मतदार संघातून ही यात्रा गेली त्या सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नसल्याची माहिती समोर आली आहे.


नांदेड (Nanded) जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघातून, वाशिम (Washim) जिल्ह्यातील एका मतदारसंघातून, अकोला (Akola) जिल्ह्यातील एका मतदारसंघातून तर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील दोन मतदारसंघातून ही यात्रा गेली होती. अशाप्रकारे 11 विधानसभा मतदार संघातून ही यात्रा गेली होती. मात्र यातील अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूर वगळता इतर कुठल्याही मतदारसंघात काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) विजय झालेला नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला कुठलाही फायदा झाला नसल्याचा समोर आला आहे.


भारत जोडो यात्रा कुठल्या मतदारसंघातून गेली होती? 


नांदेड


देगलूर - भाजपा विजयी.
नायगाव - भाजपा विजयी.
नांदेड पूर्व - शिवसेना विजयी.
नांदेड पश्चिम - शिवसेना विजयी.
किनवट - भाजपा विजयी


हिंगोली


कलमनुरी - शिवसेना विजयी.
हिंगोली - भाजपा विजयी.


वाशिम


वाशिम - भाजपा विजयी.


अकोला


बाळापूर - शिवसेना (ठाकरे गट) विजयी.


बुलढाणा


जळगाव जामोद - भाजपा विजयी.
खामगाव - भाजपा विजयी.


राज्यातील 11 मतदारसंघातून भारत जोडो यात्रा गेली होती. मात्र या एकाही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही. त्यामुळे राज्यातून भारत जोडो यात्रा गेली असली तरी त्याचा काँग्रेसला कुठेही फायदा झाल्याचं दिसून आलेलं नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


विधानसभा झाली! आता लवकरच महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता


Maharashtra Assembly Elections Results 2024 : महाराष्ट्राच्या मुलुख मैदानी महायुतीचा अतिप्रचंड विजय, भाजपला शिंदे,दादांची साथ; मविआचं आव्हान दुहेरी अंकांवरच शमलं!