बारामती : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी बारामती (Baramati Constituency) या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी खासदार शरद पवार उपस्थित होते. बारामतीच्या निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. सोबतच त्यांनी बारामतीची जनता युगेंद्र पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. यासह त्यांनी युगेंद्र पवार यांना दोन महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. त्यांच्या या सल्ल्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.


बारामतीची जनता आज नव्या पिढीतील नव्या नेतृत्त्वाचा...


यांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. युगेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झालं. ते एक उच्चशिक्षित पदवीधर आहेत. त्यांचं प्रशासन, व्यावसाय, साखरधंदात यात ते जाणकार आहे. अशा तरुणाला पक्षाने आज संधी दिली. बारामतीची जनता आज नव्या पिढीतील नव्या नेतृत्त्वाचा स्वीकार करेल. तसेच त्याच्या पाठीशी आपली शक्ती उभी करेल, याची मला खात्री आहे, अशा भावनाही शरद पवार यांनी व्यक्त केल्या. 


पाहा व्हिडीओ :



शरद पवार यांनी दिले दोन महत्वाचे सल्ले


मी स्वत: 57 वर्षांच्या पूर्वी बारामतीच्या तहसील ऑफिसमध्ये बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरायला गेलो होतो. त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून दिलेलं आहे. सतत 57 वर्षे मला लोकांनी लोकप्रतिनीधी बनन्याची संधी दिलेली आहे. माझी जनतेशी असलेली बांधिलकी हेच यामागचं कारण आहे. जनतेशी बांधिलकी ठेवा, विनम्रता ठेवा, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने संधी दिल्यानंतर ती विनम्रतेने स्वीकारून सातत्याने जागरुक राहा, एवढाच माझा सल्ला राहील. 


हेही वाचा :


युगेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, शरद पवारांचा विश्वास, अजित पवारांविरोधात ठोकला शड्डू!


Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला


Maha Vikas Aaghadi Disput: मविआचा तिढा सुटेना, वाद मिटेना; कधी जुळतंय, तर कधी तुटतंय... 10 ते 12 जागांवर मदभेद टोकाला; तोडगा निघणार?