Amit Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने महाराष्ट्र विधानसभेची (Maharashtra Vidhansabha Election 2024) आणखी एक यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार, माहीम विधानसभा मतदारसंघातून आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून याबद्दलची चर्चा होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये अमित ठाकरे यांचे नाव जाहीर झाले आहे. तर वरळी विधानसभेतून ठाकरेंचे उमेदवार आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 


ठाकरे घराण्यातले दुसरे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भवाया हुवाया आहेत. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे आता कशाप्रकारे माहीम मतदारसंघातली गणित फिरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत, असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. यावेळी लोकशाही आहे...लोकशाहीमध्ये सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. 


मनसेची दुसरी यादी खालीलप्रमाणे-






अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर रिंगणात-


माहीम मतदारसंघातून मनसेच्या अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदेगटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आतापर्यंत कधीही पराभव न झालेले सदा सरवणकर यांच्याविरोधात नवख्या अमित ठाकरेंचं आव्हान असणार आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. आदित्य ठाकरे जेव्हा 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरले तेव्हा मनसेने वरळी विधानसभेत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आदित्य ठाकरेंना निवडणूक सहज जिंकता आली. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवारी जाहीर करणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


राज ठाकरेंकडून दिवंगत रमेश वांजळेंच्या मुलाला तिकीट-


राज ठाकरेंनी मनसेचे पहिले आमदार राहिलेले दिवंगत रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांना काटे की टक्कर देणाऱ्या किशोर शिंदेंना कोथरुडमधून संधी देण्यात आली आहे.


संबंधित बातमी:


MNS Candidate List 2024 : राज ठाकरेंकडून दिवंगत रमेश वांजळेंच्या मुलाला तिकीट, चंद्रकांत पाटलांना काटे की टक्कर देणाऱ्याला संधी, मनसेचं रोहित पवारांविरोधातही तगडं प्लानिंग


अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; संजय राऊत काय म्हणाले?, Video: