Raj Thackeray MNS Candidate List 2024 : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मनसेने दुसऱ्या उमेदवार यादीमध्ये 45 जणांच्या नावाचा समावेश आहे. शिवाय राज ठाकरेंनी मनसेचे पहिले आमदार असलेले रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांना काटे की टक्कर देणाऱ्या किशोर शिंदेंना कोथरुडमधून संधी देण्यात आली आहे. तर रोहित पवारांविरोधात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये रविंद्र कोठारी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. 


दक्षिण सोलापुरात महादेव कोगनुरेंना उमेदवारी 


सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून मनसेकडून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव कोगनुरे यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र दक्षिण सोलापुरात माजी दिलीप आमदार आणि धर्मराज काडादी यांचे नाव चर्चेत असल्याने कोगनुरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे दोन दिवसापूर्वी महादेव कोगनुरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज महादेव कोगनुरे यांना मनसेने दक्षिण सोलापुरात उमेदवारी जाहीर केलीय.  शिवाय उत्तर सोलापुरातून परशुराम इंगळे यांना उमेदवारी जाहीर केलीय . सोलापुरातून आतापर्यंत मनसेने तीन उमेदवार जाहीर केलेत. पहिल्या वेळी पंढरपूर येथून दिलीप धोत्रे यांना आधीच उमेदवारी जाहीर केलीय.


मनसेने उमेदवार जाहीर केल्यानंतर कळवा मुंब्रामध्ये तिरंगी लढत 


कळवा - मुंब्रा मतदार संघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. मनसेनेही कळवा - मुंब्रा विधानसभे साठी जाहीर उमेदवार केला आहे. मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष ऍड. सुशांत सूर्यराव कळवा -मुंब्रा विधानसभेच्या रिंगाणात उतरले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीम मुल्ला व मनसेचे ऍड. सुशांत सूर्य राव यांच्यात होणार लढत होणार आहे. 






इतर महत्त्वाच्या बातम्या


राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार


Sangola Vidhansabha Election : गणपतराव देशमुखांच्या दोन नातवांमधील वाद मिटला, आजीकडून नातवांचे मनोमिलन, उद्या सांगोल्यात मोठ्या घडामोडी