पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले होते. त्यानंतर आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत झाली असून अवघ्या काही क्षणात पहिला कल हाती आला आहे. जुन्नर मतदारसंघामध्ये (Junnar Vidhansabha election 2024 ) पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अतुल बेनके (Atul Benke) यांना हा पहिला मोठा धक्का आहे. (Junnar Vidhansabha election 2024 )
या मतदारसंघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अतुल वल्लभ बेनके (Atul Benke) हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहे. तर शरद पवारांच्या (NCP Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुन्नरचे काँग्रेसचे नेते, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) यांना संधी देण्यात आली होती.
जुन्नर मतदारसंघामध्ये (Junnar Vidhansabha election 2024 ) बेनके (Atul Benke) कुटुंबाचं वर्चस्व आहे. अतुल बेनके (Atul Benke) यांचे वडील वल्लभ बेनके यांनी चारवेळा आमदारकी मिळवली होती. वल्लभ बेनके त्यांच्यानंतर आता मतदरासंघातील जनतेने अतुल बेनके (Atul Benke) यांना संधी दिली होती. तर दुसरीकडे सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) यांनी गेल्या दोन वर्षांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. शेरकर (Satyasheel Sherkar) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. या मतदारसंघात दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. (Junnar Vidhansabha election 2024 )
कोण आहेत सत्यशील शेरकर? (Who Is Satyashil Sherkar)
सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) हे काँग्रेसचे दिवंगत नेते सोपानशेठ शेरकर यांचे सुपुत्र आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते शेतकरी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. जुन्नर तालुक्यातल्या युवा वर्गात सत्यशील शेरकर (Satyasheel Sherkar) यांची चांगली क्रेझ आहे.
2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?
2019 च्या निवडणुकीमध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके (Atul Benke) यांनी विजय मिळवला होता. मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शरद सोनवणेंचा पराभव झाला होता. अतुल बेनकेंना 74,958 तर शरददादा सोनवणेंना 65,890 आणि अपक्ष लढलेल्या आशाताई बुचकेंना 50,041 मते मिळाली होती. या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षफुटीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. (Junnar Vidhansabha election 2024 )