पुणे: पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली ती मावळ पॅटर्नमुळे. मावळ मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाचे नेते उभे ठाकले होते. अपक्ष उमेदवारी दाखल करत मावळमध्ये बापूसाहेब भेगडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघातील निवडणुकीमध्ये भाजपसह स्थानिक सर्व पक्षांनी एकत्र येत अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुनील शेळकें (Sunil Shelke) विरोधात आघाडी उघडली होती. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे (Bapu Bhegade) यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह मनसे आणि बाकी पक्षांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र, मावळ पॅटर्न फसल्याचं चित्र आता दिसून येत आहे. (Maval Assembly constituency)
सुनील शेळके (Sunil Shelke) विरूध्द इतर पक्षांनी अपक्ष उमेदवारांला दिलेला पाठिंबा यामुळे मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी 2019 च्या मताधिक्क्यातील मोठं लीड 11 व्या फेरीतच मिळवलं आहे. शेळके (Sunil Shelke) यांची मोठ्या मताधिक्क्याकडे वाटचाल सुरू आहे. ते विजयाकडे घौडदौड करत आहेत.
मावळ मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच अजित पवारांचे (Ajit Pawar) उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आघाडी घेतल्याचं दिसून आलंं. सुरूवातीपासून घेतलेली आघाडी अकराव्या फेरीपर्यंत कायम राहिली. अकराव्या फेरीअखेर एकूण 1 लाख 04 हजार 263 मतांची मोजणी पूर्ण झाली असून सुनील शेळके यांना 75 हजार 449 तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे (Bapu Bhegade) यांना 26 हजार 758 मतं मिळाली आहेत. सुनील शेळके (Sunil Shelke) विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी 2019 मध्ये इतिहास घडवला होता. तब्बल 25 वर्ष भाजपची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळालं होतं. या विधानसभेत देखील ते विजयाचा गुलाल उधळणार अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे ते मोठ्या मताधिक्क्याच्या विजयाकडे त्यांची घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.बहुतांश राजकीय पक्षांनी अपक्ष बापू भेगडे (Bapu Bhegade) यांना पाठिंबा दिल्याने मतदारसंघांमध्ये मावळ पॅटर्नची चर्चा चांगलीच चर्चा झाली होती.
2019 विधानसभा निवडणुकीत काय झालं?
सुनील शेळके (Sunil Shelke) यांना 2019च्या निवडणुकीमध्ये 167712 इतकी मतं मिळाली होती तर भाजपचे उमेदवार बाळा भेगडे (Bapu Bhegade)यांना 73770 इतकी मतं मिळाली होती.