Harshvardhan Patil : 2009 मध्ये माझ्या विरोधात बंडं केल्यानंतर सहा वर्षांसाठी पक्षातून तुम्हाला बडतर्फ केलं, पण दोन वर्षात परत आला. आमदार कोणी केलंं, मंत्री कोणी केलं पण पवार साहेबांना तुम्ही दगा दिला, अशा शब्दात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तामामा भरणे यांना टोला लगावला. आज इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर विधानसभेसाठी अर्ज भरला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी तुफान फटकेबाजी करताना दत्ता मामा भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याव कडाडून हल्लाबोल केला. मलिदा गँग हटाओ इंदापूर बचाओ कार्यकर्त्यांचा नारा असल्याचा टोला हर्षवर्धन पाटील यांनी टोला लगावला. उद्याच्या विधानसभेतील निवणूक किती रंगी आहे माहित नाही, पण तुतारीमय आहे हे नक्की. तुतारी महाराष्ट्राच्या विधानभवनात वाजणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखवला. प्रशासन चालवण्यासाठी चांगली माणसं लागतात. म्हणून पवार साहेबांनी माझा विचार केला असेल. याचा अर्थ उमेदवारी मागणारी कमी आहेत असं नाही, असेही ते म्हणाले.
कोणी साड्या वाटल्या का? तेलाचा डबा वाटला का?
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल केल्यानंतर आपला आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. तालुक्यात गुंडगिरी वाढू दिली नाही. आज दहा वर्षात तालुक्यात काय चाललं आहे? अशी विचारणा त्यांनी केली. निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर हर्षवर्धन पाटील प्रत्येक टक्केला पट्टी केला उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की राज्यात विस्कटलेली घडी पुन्हा बसवायचे असेल, तर जनतेच रयतेचं राज्य आणायचं असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. त्यांनी पुढे सांगितले की आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या, पण कोणी साड्या वाटल्या का? तेलाचा डबा वाटला का? मग आज वेळ का आली? अशी विचारणा हर्षवर्धन पाटील यांनी केली.
एवढी मस्ती आणि दादागिरी तुमच्यात का आली?
ते म्हणाले की, एका पत्रकाराने महिलांनी फेकून दिलेल्या साड्या म्हणून बातमी लावली म्हणून त्याला धमकी दिली. त्या धमकी देणारा मागे कोण आहे? त्या धमकी देणाऱ्याचा जाहीर निषेध असल्याचे ते म्हणाले. एवढी मस्ती आणि दादागिरी तुमच्यात का आली? ती उतरवल्या शिवाय राहणार नाही. इंदापूरचा बिहार होऊ द्यायचा नसेल, तर तर तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबा. ग्रामपंचायतीपेक्षा अधिक ताकदीने काम करा. 24 दिवस जीवाचं रान करा, पुढील पाच वर्ष तुमची जबाबदारी हर्षवर्धन पाटलाची असल्याचे ते म्हणाले.
आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजना चालू करणार
उजनी धरणावर पूल करा अशी कोणाची मागणी होती का? ते चारशे कोटी उजनीच्या बुडीत बंधार-यासाठी खर्च केले असते तर चार हजार कोटींच उत्पन्न या शेतक-याने घेतले असते. त्यांनी सांगितले की, लाडकी बहिण योजना स्थगित करण्यात येत आहे निवडणूक आयोगाने आदेश काढला. 112 अद्यादेश निवडणूक आयोगाने रद्द केले. एक मंत्री म्हणतो लाडकी बहिण आम्हाला वाचवणार आमची मते वाढतील. 20 तारखेचं मतदान 23 तारखेचा निकाल 31 तारखेपर्यंतचे पैसे विषय संपला, अशी टीका त्यांनी केली. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजना चालू करणार असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या