Devendra Fadnavis : भाजप शक्तिमान पक्ष आहे त्यामुळे भाजपवर हल्ला केल्याशिवाय राज्यात महायुतीला डॅमेज करता येणार नाही, हे महाविकास आघाडीने कर्नाटकमधून जे रणनीतीकार आणले आहेत त्यांनी सांगितलं होतं. मात्र, लोकांना काही माहीत नसतं तेव्हा लोकांना ते चिपकत असतं. मी गेल्या 25 वर्षांपासून विधीमंडळात आहे. त्यामुळे यांनी कितीही शिव्या, शाप, दुषणं दिले तरी देवेंद्र फडणवीस काय आहे ते लोकांना माहित आहे, त्यामुळे याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (30 ऑक्टोबर) एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझ व्हिजन' या विशेष कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर मुलाखत दिली.
या मुलाखतीमध्ये बोलताना सिंचन घोटाळा, लाडकी बहिण योजना, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील सद्यस्थिती आधी अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणीस म्हणाले की, भाजप हा शक्तिमान पक्ष आहे. त्यामुळे जर राज्यामध्ये महायुतीला डॅमेज करायचं असेल, तर कर्नाटकामधून आणलेल्या रणनीतीकारांनी भाजपवर हल्ला करण्यास सांगितले. मात्र, या गोष्टींचा काहीही फरक होणार नाही.
लाडकी बहिण योजनेसाठी दुसऱ्या योजनेतून पैसा वळवला नाही
फडणवीस म्हणाले की, शिवसेनेनं केवळ चार जागांसाठी युती तोडली होती. मात्र, त्यांनी युती तोडल्याने मी मुख्यमंत्री झालो, अन्यथा त्यांचा मुख्यमंत्री झालं असता, असे फडणवीस म्हणाले. जनतेनं एकनाथ शिंदेंची शिवसेनेला स्वीकारली, तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही स्वीकारलं असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, माजी भाजप खासदार गोपाल शेट्टी यांच्या बंडखोरीवर फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, गोपाल भाई आग्रही मत मांडतात, त्यांची समज काढू. दरम्यान, लाडकी बहिणीसाठी एकही पैसा दुसऱ्या योजनेतून वळवला नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यास पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करतील, पण आमच्या बहिणी ते सरकार येऊच देणार नाहीत, असे ते म्हणाले.
आबांबाबत बोलणे योग्य नाही
दरम्यान, अजित पवार यांनी स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आर. आर. पाटील हयात नाहीत, त्यांच्याबद्दल काही बोलणं योग्य नाही. पण सिंचन घोटाळ्याची जी चौकशी सुरु झाली ती काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात झाली. हा कट होता की नाही? मी त्यात जाणार नाही, पण अजित पवार यांच्याविरोधात जी चौकशी झाली त्याची माहिती घ्या. आबा आपल्यात नाहीत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही.
इतर महत्वाच्या बातम्या