बारामती: बारामती मतदारसंघात लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील पवार विरूध्द पवार अशी लढत होणार असल्याचे संकेत आता दिसून येत आहेत. काल(बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली, त्यामध्ये अजित पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात येणार आहे. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारच सामना रंगणार असल्याची चिन्हे आहेत. त्याचं कारण म्हणजे लवकरच युगेंद्र पवार यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आत्तापर्यंत एकूण ४० एबी फॉर्म देण्यात आले आहेत. 


काल(बुधवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली, त्यामध्ये अजित पवारांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणेच विधानसभेला पवार विरूध्द पवार अशी लढत निवडणुकीच्या रिंगणात दिसून येईल. गेल्या अनेक दिवसांपासून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता लवकरच त्यांना एबी फॉर्म देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. 


अजित पवार 28 तारखेला बारामतीमधून भरणार उमेदवारी अर्ज


28 तारखेला बारामती मधून उमेदवारी भरणार आहेत. तर दुसरीकडे त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हेच विरोधातील उमेदवार असतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती.  अजित पवारांचा मतदारसंघाच प्रचार सुरू झाला आहे. युगेंद्र पवार देखील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकांपासून युगेंद्र पवार चर्चेत आहेत. तर बारामती विधानसभेच्या निवडणुकीकडे पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. 


कोण आहेत युगेंद्र पवार? (Who is Yugendra Pawar) 


अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव


युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार  


शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय


शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली


वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले


फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात


बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार


अजित पवारांची राजकीय कारकिर्द


१९९१ पासून सलग सात वेळा आमदार
पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री
खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अशी ३० वर्षांहून अधिकची राजकीय कारकीर्द
राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक
राष्ट्रवादीचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष