बार्शी: बार्शी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री ॲड. दिलीप सोपल यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून काल(गुरुवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दिलीप सोपल यांनी 2019च्या निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 27.48 कोटी रुपयांची होती. 2014 मध्ये त्यात अंदाजे सात कोटींची वाढ होऊन ती 34.41 कोटी रुपये इतकी झाल्याचे सोपल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार समोर आले आहे. त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची पिस्तुल असून अन्य मालमत्ता देखील आहे.


माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या संपत्तीत 6 कोटी 87 लाख रुपयांची वाढ झाल्याचे विधानसभा निवडणुकीत त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रातून दिसून येतं आहे. 2019 साली सोपल यांच्याकडे सुमारे 23 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती तर 4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. 2024 मध्ये मात्र स्थावर मालमत्ता ही 28 कोटी तर जंगम मालमत्ता ही 5 कोटी झाली आहे. मागील पाच वर्षात सोपल यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र त्यांच्यावर दाखल असलेले दोन गुन्हे अद्याप ही प्रलंबित आहेत. शिवाय त्यांच्यावर कोणतेही मोठे कर्ज नसल्याचे त्यांनी शपथपत्रातून सांगितले आहे. 


सोपल यांच्याकडे पाच लाखांची पिस्तुल


माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याकडे पाच लाख रुपयांची पिस्तुल असून अन्य मालमत्ता देखील आहे.


दिलीप सोपल, बार्शी, ठाकरे सेना शपथपत्र 
शिक्षण : एलएलबी 


गुन्हे - 


2019 - 2
2024 - 2


बदल - गुन्ह्यात कोणतीही वाढ नाही. 


जंगम मालमत्ता :-


2019- 4 कोटी 4 लाख 35 हजार 418 रुपये
2024 - 5 कोटी 33 लाख 14 हजार 31 रुपये 
बदल - 1 कोटी 28 लाख 78 हजार 892 वाढले 


स्थावर : 


2019 - 23 कोटी 23 लाख 76 हजार
2024 - 28 कोटी 81 लाख 80 हजार 
बदल - 5 कोटी 58 लाख 4 हजार रुपयांची संपत्ती वाढली 


कर्ज : 


2019 - 62 हजार  
2024 - 60 हजार
बदल - 2 हजारांनी कर्ज कमी


सोपल यांच्या 2024 मधील संपत्तीचे विवरण


जंगम मालमत्ता : 5 कोटी 33 लाख


स्वसंपादित मालमत्ता : 3 कोटी 45 लाख 80 हजार


वारसाप्राप्त मालमत्ता : 25 कोटी 36 लाख


बचत खात्यातील रक्कम व ठेवी : 1,16,93,130 रुपये


शेअर्समधील गुंतवणूक : 5,12,050 रुपये


एक वाहन : किंमत 17.16 लाख रुपये


दागिने : 15 तोळे (किंमत 12लाख रुपये)


पिस्तुल : किंमत 5 लाख रुपये