बारामती : आज राज्यभरात विधानसभा (Inadpur Harshawardhan Patil) निवडणुकीच्या तोफा थंडावणार आहे. आज सर्वत्र प्रचार, रॅली आणि सांगता सभा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच इंदापुरात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सभा घेत आहेत. दरम्यान यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला.
"पवार साहेबांना सोडून जाण्याचं महापाप एका बाजूला आणि तुम्ही केलेले काम एका बाजूला"
इंदापुरातील सभेत बोलताना उमेदवार हर्षवर्धन पाटील म्हणाले, अजित पवार सांगतात मी मतदार संघात इतक्या कोटींची काम केली तितक्या कोटींची काम केली मात्र त्यांनी शरद पवारांना सोडून जाण्याचं मोठं पाप केलं आहे. यावेळी पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले साहेब तुम्ही त्या उमेदवाराला काय दिलं नाही. तुम्ही जे दिलं आहे त्यावरून माझ्यासारखा एका माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता किंवा दुसरा कोणी असतं तर मरेपर्यंत कोणी विसरला नसतं इतकं तुम्ही त्यांना दिलं आहे. जिल्हा परिषद दिली. कारखाने दिले. बँक दिली दोन वेळा आमदारकी दिली. मंत्रिपद दिलं. पालकमंत्री पद दिले. व्यवसाय करण्याकरता साहेब तुमच्या फोनवर मोठमोठ्या एजन्सी मिळाल्या त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आपला कार्यकर्ता मोठा व्हावा, त्यासाठी काम करावं ही प्रत्येक नेत्याची भावना असते त्यात काहीच गैर नाही पण ते केल्यानंतर ज्याच्यासाठी आपण करतो त्याचा पण कर्तव्य आहे. वडिलांनी जर आपल्या सर्व काही परिवर्ष केलं असेल, तर वडील संकटात आल्यानंतर मुलाचं काम काय असतं कुटुंबातील नव्या पिढीच काय काम असतं. एक संस्कार आहेत आपल्यावर आपण संस्कारित माणसं आहोत. एका संस्कारी कुटुंबातील माणसं आपण आहोत नातीगोती सांभाळणारी माणसं आपण आहोत एकमेकांचे मन सांभाळणारी आपण माणसं आहोत. असं असताना पवार साहेबांवर संकट आल्यानंतर तुम्ही सोडून गेलात आणि आज तुम्ही सांगता 6500 कोटींची कामे केली. मी तर असं म्हणेन 6000 कोटीची काय सहा लाख कोटीची तुम्ही काम केली असली तरी पवार साहेबांना सोडून जाण्याचं महापाप एका बाजूला आणि तुम्ही केलेले काम एका बाजूला, हे चांगलं नाही ही संस्कृती आपली नाही आणि लोकांनी यातून काय संदेश घ्यायचा असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले ही माणसाशी वागायला लागली त्यामुळे त्याची थोडीशी लागण आमच्या इथे देखील सुरू झाली. आम्ही कोणाला सभापतीपद दिलं कोणाला बँकेचे चेअरमन बनवले कोणाला जिल्हा परिषद दिली कोणाला संचालक केलं आणखी काही पद दिली घरातून आणली खुर्चीवर बसवली समाजात नेली समाजात नेली तालुक्याची ओळख करून दिली भाषणामध्ये त्यांचा कौतुक केलं त्यांना पुढे आणलं सगळ्या जाती धर्मांना घेऊन पुढे चाललो आपण आणि निवडणुकीच्या तोंडावर ही मोठे भर स्वार्थी माणसं मला सोडून गेली मला एकदा वाढलं त्यानंतर माझ्यावर टीका केली मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे कार्यकर्ते हवालदिल झाले त्यानंतर घर फोडली घर फोडायची नवीनच स्टाईल सुरू झाली आहे. कोणाचं कुटुंब मोठे आहे सांगा इथं सगळ्यांची भावकी मोठी आहे मोठी भावकी आहे नातीगोती आहेत मी एकट्याची माझी किंवा पवार साहेबांची नाहीत राजकारण आपण कोणत्या लेवलला घेऊन चाललो आहे आपण घर फोडायला लागलो आहोत समाजामध्ये एक वेगळा संदेश द्यायला लागलो, असंही पुढे हर्षवर्धन पाटील म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, मी कधीच नाव घेत नाही पण अजित पवार यांचा आज नाव घेतो अजित दादा पवार निमगाव केतकी इथे आले त्यावेळी तिथे भाषण त्यांनी केलं त्यावेळी ते बोलले म्हणले आता हर्षवर्धन पाटलाकडे कोण राहिला आहे, चौघ राहिले आहेत ते असे म्हणाले. एक हर्षवर्धन पाटील दुसऱ्या त्यांची पत्नी तिसरी मुलगी आणि चौथा मुलगा आहे. 23 तारखेला बारा वाजता हर्षवर्धन पाटील तुम्हाला फोन करेल शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच फोन करेन मी त्यांना फोन करेन कारण त्यांनी माझ्याबद्दल इथे एक शब्द वापरला तुम्ही इथे सांगू शकत नाही. त्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ माझ्याकडे आहे. पण मी आता सांगू शकत नाही. आता इतका वेळ नाही. असली भाषा आजी माणसं आपल्यापासून बाजूला गेलेली आहेत, असं यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले.