मुंबई काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मुख्य नेत्यांपेक्षा त्यांची मुलं विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. वांद्रे पश्चिम येथील जागेवर इथे बाबा सिद्दिकी स्वतः इच्छुक नाही, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. पण त्यांचा मुलगा झिसीन सिद्दिकी मात्र निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
दुसरीकडे कृपाशंकर सिंह यांनी आपला मुलगा नरेंद्र मोहन सिंह याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याचे समजते. लातूर ग्रामीण मधून अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे.
मुंबई विधानसभा उमेदवारांची निवड समिती करणार आहे. या समितीत माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांचा समावेश असणार आहे. ही समिती उमेदवारीचे आलेले अर्ज, इच्छुक पाहून उमेदवारांची यादी बनवणार आहेत.
एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर आल्या असताना पक्ष सोडून जाणारे आमदार आणि निवडणूक लढवण्यास योग्य उमेदवार मिळवणे हे दुहेरी आव्हान काँग्रेसपुढे आहे.