Uddhav Thackeray Shiv Sena Candidate List 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Group) पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांसाठी एकूण 65 जणांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. तसेच अनेक नवे चेहरे यंदा ठाकरे गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेत. झीशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघातून वरुण सरदेसाईंना (Varun Sardesai) ठाकरे गटाने मैदानात उतरवलं आहे. तसेच ठाण्याच्या मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात केदार दिघे (Kedar Dighe) यांना ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आलं आहे. 


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीच्या प्रचंड काथ्याकूट केल्यानंतर 85-85-85 असा मविआचा फॉर्म्युला ठरला आहे. मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा फॉर्म्युला जाहीर केला. 270 जागांवर आमची पूर्ण सहमती झाली. उरलेल्या जागा ज्या आहेत त्या मित्रपक्षांशी चर्चा करुन, 288 जागांवर उमेदवार जाहीर करु, असं मविआच्या नेत्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून नाना पटोले, ठाकरेंकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडून जयंत पाटील उपस्थित होते. 


मुंबईच्या मैदानात कोण कोण? 


वरळी - आदित्य ठाकरे 
माहीम - महेश सावंत
वांद्र पूर्व - वरुण सरदेसाई 
कलीना - संजय पोतनीस
कुर्ला (अजा) - प्रविण मोरजकर
चेंबूर - प्रकाश फातर्पेकर
अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके
गोरेगांव - समीर देसाई
दिंडोशी - सुनील प्रभू
जोगेश्वरी पूर्व - अनंत (बाळा) नर
भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर
विक्रोळी - सुनील राऊत 
मागाठाणे - उदेश पाटेकर


मुंबईतील प्रतिष्ठेच्या लढतीकडे देशाचं लक्ष 


ठाकरेंचं होमग्राऊंड असणाऱ्या मुंबईत अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती यंदाच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यातच संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला माहीमचा मतदारसंघ. माहीमच्या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकांच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे हे पहिल्यांदा रिंगणात असूनही शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवलाय. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघात वरुण सरदेसाई हे रिंगणात उतरले आहेत. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळीचा गड पुन्हा एकदा राखण्यास यशस्वी होणार याकडे लक्ष लागून राहिलं आह. 


270 जागांची चर्चा पूर्ण 


दरम्यान महाविकास आघाडीमध्ये 270 जागांवर चर्चा पूर्ण झाली असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. त्यांनी म्हटलं की, संजय राऊत म्हणाले, "शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक पार पडली. महाविकास आघाडी जागा वाटप सुरुळीत पार पडलं आहे. या सगळ्यांना सामावून घेऊ. 85, 85आणि 85 जागांवर समंती झाली.  उद्या आम्ही सगळे बसत आहोत आणि जागांच करेक्शन करत आहोत. महाविकास आघाडीत आम्ही सोबत आहोत. आमच्या शिवसेनेच्या जागा जाहीर झाल्या, मात्र त्यामध्ये देखील करेक्शन आहे, असं संजय राऊत म्हणाले.


ही बातमी वाचा : 


मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!