मुंबई : भाजपकडून राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2022) दोन जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मंत्री अनिल बोंडे आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  अनिल बोंडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील  आहे. कायम चिथावणीखोर वक्तव्यासाठी प्रसिद्ध अशीही त्यांची ओळख आहे


डॉ. अनिल बोंडे यांचा परिचय



  • 1998 मध्ये अनिल बोंडे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

  • 2004 साली शिवसेनामधून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांचा पराभव झाला

  • 2009 मध्ये शिवसेना पक्षाने तिकीट नाकारले त्यामुळे त्यांनी स्वतःचा जन संग्राम पक्ष स्थापन करून भाजप शिवसेना युतीच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला.

  • 2014 मध्ये नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करून त्यांनी 2014 ची वरुड-मोर्शी विधानसभा मधून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

  • तर 2019 मध्ये त्यांना शेवटचे चार महिने भाजपने कृषीमंत्री पद दिले आणि अमरावती जिल्हा पालकमंत्री

  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी डॉ अनिल बोंडे यांचा मंत्री असतांना पराभव केला.

  • त्यानंतर भाजपने त्यांना किसान मोर्चा प्रदेशध्यक्ष पद दिले त्यांनंतर राष्ट्रीय किसान मोर्चा सरचिटणीस पदी

  • गुजरात व मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रभारी भाजप


एप्रिलमध्ये झाली होती तीन महिने कारावासाची शिक्षा


वरुडच्या नायब तहसिलदारांना मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासासह 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना जामीनही मिळाला आहे.


भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर


भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा या राज्यांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. निर्मला सीतारामन आणि जगेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव बोंडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली आहे. राजस्थानमधून घनश्याम तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे.


संबंधित बातम्या :


Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात? निवडणुकीतील चुरस वाढणार, घोडेबाजाराची शक्यता


Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल झुंजणार? भाजपकडून धनंजय महाडिक अर्ज भरण्याची शक्यता