Pune Bypoll Elections : आमदार मुक्ता टिळक(Pune Bypoll Election)यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी (Kasba Bypoll Election) भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातच पुण्यातील भाजपच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नेत्याने निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतल्याने भाजपचं प्रचाराचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून गिरीश बापटांची प्रकृती खराब आहे. त्यामुळे प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापटांनीच पत्राद्वारे दिली आहे. 


कसबा मतदार संघात गिरीश बापटांची मागील अनेक वर्षांपासून सत्ता होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत गिरीश बापटांना किंगमेकर म्हटलं जात होतं. मुक्ता टिळकांच्या निवडणुकीच्या वेळीदेखील त्यांची प्रचारात महत्वाची भूमिका होती. मात्र पोट निवडणुकीच्या वेळी त्यांनी आजारपणाचं कारण देत घरोघरी जाऊ शकत नाही, असं सांगत माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. 


दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार गिरीश बापटांची भेट घेतली होती. त्यांनी बापटांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यावेळी कसब्याचं टेन्शन घेऊ नका नक्की आपणच जिंकू, असा विश्वास बापटांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला होता. मात्र त्यानंतर दोनच दिवसांत बापटांनी या प्रचारातून माघार घेतल्याने आता भाजप प्रचारासाठी नेमकं काय करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाली आहे. गेले 3 महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे खूप कमी काम केले असून तरीसुद्धा मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही, असं बापटांनी सांगितलं आहे. 


एकीकडे भाजपने प्रचारासाठी मोठी तयारी केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्यासोबत 40 स्टार प्रचारकांची फौज तयार केली आहे. त्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची नावं आहे. त्यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौरे करत आहेत. शिवाय राज्यमंत्रीमंडळाचे दोन बडे नेते देखील या प्राचारासाठी पुण्यात सक्रिय झाले आहेत. मात्र पुण्यातील महत्वाचे आणि कसबा मतदार संघावर मागील अनेक वर्ष सत्ता गाजवणारे गिरीश बापट प्रचारात सहभागी होणार नसल्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये भाजपकडून प्रचाराचा धुमधडाका; अमित शहांनंतर राज्य मंत्रिमंडळातील 'हे' नेते मैदानात