Sushma andhare, Mumbai : "सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) ,पंकजा मुंडे (Pankaja Munde) या ओबीसी नेत्यांचा भाजप मुख्यमंत्री पदासाठी विचार करणार ? की भाजपमधील ओबीसी नेत्यांची कायम उपेक्षा होणार? मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवताना त्याच त्या नावावर खल का व्हावा?", असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी X पोस्टच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी भाजपा शिंदे, अजित पवार यांना इतक्यात दुखावणार नाही असे दिसते, असंही अंधारे म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा रंगली आहे. याशिवाय शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केलाय. विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 शिवसेना ,शिंदे गटाला- 57 आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट) 41 जागा मिळाल्या आहेत.
अजित पवार मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार काय म्हणाले?
प्रत्येकाने आपल्या जवळ काय आहे हे पाहायला पाहिजे. आमची काळजी करू नये. आमची काळजी करायला आमचे आमदार, महायुती, माझ्या पक्षासोबत असणारे नेते, कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ, असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं..
महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस यांना आहे, आत्ताच सांगून ठेवतो. जर उलट सुलट राजकारण झालं तर 1000 कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील. मी त्यातला एक असेन, असं वक्तव्य भाजप नेते अवधूत वाघ यांनी केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या