Ajit Pawar : राज्यात सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. उद्या (26 नोव्हेंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) दिल्लीला रवाना होणार आहेत. आज दिवसभरात सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अंतिम चर्चा अजित पवार यांच्यासोबत झाल्यानंतर आता दोन्ही नेते दिल्लीला रवाना होणार आहेत. सध्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.
राज्यात महायुतीला मोठं यश, मुख्यमंत्री कोण होणार?
दरम्यान, राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. मात्र, सध्या राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच कोणत्या पक्षाला मंत्रीपदं मिळणार याची देखील चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. महायुतीला राज्या मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असी मागणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी असी देखील इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळं राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आजच मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जातेय. ब्राह्मण, ब्राह्मणेतर या प्रश्नाला मतदानाने उत्तर दिले आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात निवडणूक झाली आहे. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी भाजपाच्या दिल्लीतील वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 29 नोव्हेंबरला नवीन सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं या मंत्रीमंडळात कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
मराठा नेताच मुख्यमंत्री असावा, मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदेच सोडवू शकतात : शितल म्हात्रे