Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, ते नेते बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्वच पक्षीय नेत्यांनी केलेली बंडखोरी सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकातील भाजपमध्ये बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष सुरु झालाय. भाजपच्या सत्कार मेळाव्यात बंडखोरांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. भाजपच्या आमदारांसह शहराध्यक्षांची बंडखोरांना पक्षात न घेण्याची भूमिका अनेक स्थानिक नेते मांडताना दिसत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान विरुद्ध बंडखोर संघर्ष
भाजपच्या सत्कार मेळाव्यात बंडखोरांविरुद्ध बोलताना शहरातील भाजपच्या तीनही नवनिर्वाचित आमदारांनी खंत व्यक्त केली आहे. नाशिक भाजपमध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान विरुद्ध बंडखोर हा वाद सुरू झालाय. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात दिनकर पाटील यांनी बंडखोरी केली होती. दिनकर पाटील यांना मनसेने उमेदवारी दिली होती. चांदवड विधानसभा मतदारसंघात राहुल आहेर यांच्याविरोधात केदा आहेर यांनी बंडखोरी केली होती. याशिवाय जयश्री गरुड यांनी बालगाणमध्ये दिलीप बोरसे यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. इतकचं नाही तर भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी विरोधी पक्षातील उमेदवारांचा प्रचार देखील केला होता.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले काय म्हणाले?
- मागच्या पाच वर्षांपूर्वी माझ्या विरोधात आपल्याच पक्षातून मला आव्हान देण्यात आलं
- मी मागच्या पंचवार्षिक मध्ये गप्प बसलो पण आता पक्षाने तसं करू नये
- सोडून गेलेल्यांना आता पुन्हा पक्षप्रवेश देऊ नका
- येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप पक्ष हा एक हाती सत्ता मिळवल्याशिवाय राहणार नाही
- आता हिंदुत्वाची लाट आहे, त्यामुळे एखादी सत्ता मिळवण्यामध्ये आपण सर्व काम करू
- सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आता बळ द्या
- ज्यांनी चांगले काम केले आहेत निवडणुकीत कष्ट घेतले आहे त्यांना चांगले पद द्या
- कार्यकर्त्यांच्या या भाऊ नाहीत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझं काम आहे कर्तव्य आहे
- माझा विजय हा माझ्या एकट्याचा नाही तर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांचा विजय आहे
इतर महत्त्वाच्या बातम्या