Maharashtra Vidhansabha Election : ईव्हीएमवर शंका घेणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार सुनील राऊत यांना शिंदेंच्या पराभूत महिला उमेदवार सुवर्णा करंजे यांनी आव्हान दिलं आहे. विक्रोळी विधानसभेमध्ये आमदार सुनील राऊत राजीनामा द्यायला तयार असतानाच शिंदेंच्या उमेदवाराने प्रत्युत्तर दिलं आहे.
सुनील राऊत काय म्हणाले होते?
विक्रोळी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत हे 15000 मतांनी जिंकून आले आहेत. यावर त्यांनी ट्विटरवर मी 40 ते 50 हजार मतांनी जिंकलो पाहिजे होतो. जर बॅलेट पेपरवर निवडणूक होत असतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशा आशयाचे ट्वीट सुनील राऊत यांनी केले होते.
सुवर्णा करंजे यांचं सुनील राऊतांना प्रत्युत्तर
निवडणुकीच्या निकालात दोन नंबर वर असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या सुवर्णा करंजे यांनी देखील ट्विटरवर सुनील राऊतांना प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली आहे. मी निवडणुकीच्या सामोरे जाण्यास तयार आहे. मी 25000 हजार मतांनी जिंकेल ज्यांनी महिलांचा अपमान केला आहे त्याला महिलाच खाली घालावी लागणार आहे. सुनील राऊतांनी राजीनामा देऊनच दाखवावा मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया
सुवर्णा करंजे यांनी दिली आहे.
सुनील राऊत यांनी प्रचारादरम्यान सुवर्ण करंजे यांचा उल्लेख केला होता बकरी म्हणून
विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील राऊत यांनी प्रचारादरम्यान सुवर्ण करंजे यांचा उल्लेख बकरी म्हणून केला होता. हीच बकरी निकालानंतर कापू असे देखील म्हटले होते. हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये सुनील राऊत यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
नवनीत राणांनी निवडणूक बॅलेटवर होणार, असं पत्र आणावं : बळवंत वानखेडे
महाविकास आघाडीला EVM मशीनवर शंका असेल तर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेटवर निवडणूक घ्यावी, असं आव्हान अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिलं होतं. त्यावर खासदार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया आली.. नवनीत राणांनी मला लेखी पत्र द्यावं येणारे निवडणूक बॅलेट पेपरवर होणार होणार.. मी राजीनामा देण्यास तयार आहे पण आधी त्यांनी माझी अट पूर्ण करावी असं अमरावतीच्या काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे..
इतर महत्त्वाच्या बातम्या