Maharashtra NCP Political Crisis :अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषेद घेत प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का ? असा सवाल केला. त्याशिवाय शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता.. मग त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार का ? शरद पवार अध्यक्ष आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.  


अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या घटनात्मक आहेत का ? शरद पवार अध्यक्ष आहेत, मग यांच्या नियुक्त्या घटनात्मक कशा? पक्षाची मान्यता नाही, त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केलेय, त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवारांची पत्रकार परिषद किटी पार्टी होती, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. 


काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस वतीने पत्रकार परिषद काही जणांनी घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये विविध पदे वाटण्यात आली, त्यांना संविधानिक मान्यता नाही. एकच राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यांचे अध्यक्ष शरद पवार आहेत...ते सुद्धा मान्य करताय. पार्टी अध्यक्षाचे अधिकार काय आहेत ?? शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आले आहे, असे आव्हाड म्हणाले.


पक्षाध्यक्षाला लपवून तुम्ही पक्ष विरोधी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त केले, त्यामुळे त्यांना दोघांना निलंबित केलं आहे. तिथे सगळे नेते म्हणतात अध्यक्ष शरद पवार आहेत. मग प्रश्न उरतो नैतिकतेचा ? मग तुम्ही प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे वर केलेली कारवाई मानता की नाही ? शरद पवार जयंत पाटील म्हणाले यामध्ये कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कायद्याच्या अज्ञानापोटी केलेल्या नियुक्त्याना मान्यता मिळत नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


आमच्या नशिबाने शिवसेना बंडबाबत ज्या याचिका दाखल करण्यात आल्या त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. चंद्रचूड यांनी जजमेंट सांगितलं आहे, की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. मुख्य प्रतोद व्हीप निवडण्याचा अधिकार हा फक्त पक्ष अध्यक्षांना आहे. विधानसभा एक गट बाहेर जातो आणि पक्ष म्हणतो त्याला तसा अधिकार नाही. ज्या पक्ष्याच्या नावाने फॉर्म भरला आहे आणि नंतर म्हणाल तुमचा काही संबंध नाही, असं होणार नाही..तुम्हाला दुसऱ्या पक्षात जावं लागेल हाच पर्याय राहील तुमच्याकडे कितीही संख्या असेल. 40 आमदारांच्या नावाने तुम्ही पक्ष म्हणू शकत नाही..कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार करावा लागतो. पक्ष संविधानाने चालतो, आणि तो पक्ष शरद पवार यांच्याकडे आहे, असे आव्हाड म्हणाले.