मुंबई : लोकसभा निवडणुकrत महाराष्ट्रातील 48 जागांचा "रिंगसाईड रिसर्च "चा एक्झिट पोल समोर आला आहे . या पोलनुसार ही महायुतीला जोरदार धक्का बसताना दिसतोय. तर महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळत असल्याचे समोर येते आहे. मविआला 29, महायुतीला 18 तर अपक्षाला 1 जागेवर यश मिळेल असा रिंगसाईड रिसर्च चा अंदाज आहे.
देशाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचाही निर्णय जनतेच्या न्यायालयात होईल असं सांगितलं जात होतं. त्यामुळे महाराष्ट्राचे एक्झिट पोलचे आकडे नेमके काय दर्शवतात याची उत्सुकता होती. त्यात "रिंगसाईड रिसर्च " च्या एक्झिट पोल मध्ये महायुतीची जोरदार पीछेहाट होताना दिसते आहे.
विशेष म्हणजे अनेक मोठमोठ्या नेत्यांना यात पराभवाचा सामना करावा लागू शकतो असेही चित्र आहे. सर्वात जास्त चर्चेत असलेली जागा म्हणजे अर्थात बारामती लोकसभा. इथे कुठल्या पवारांच्या बाजूने निकाल लागेल याच्या चर्चा झडत होत्या. अखेर यात शरद पवारांच्या बाजूने निकाल लागेल अर्थात सुप्रिया सुळे विजयी होतील असे रिंगसाईड रिसर्चच्या एक्झिट पोल मधून समोर येते आहे. तर शिरूरमधून अमोल कोल्हेच पुन्हा बाजी मारतील.
आणखी चर्चेत असलेली जागा म्हणजे माढा. माढ्यातही भाजपमधून निवडणुकीआधी राष्ट्रवादीमध्ये आलेले धैर्यशील मोहिते बाजी मारतील असा रिंगसाईड रिसर्च चा अंदाज आहे. तर विदर्भातील चर्चेची जागा म्हणजे चंद्रपूरची जागा. यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही पराभवाचा धक्का बसू शकतो असे रिंगसाईड रिसर्च चा पोल सांगतो. तर मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असलेली जागा म्हणजे बीड लोकसभा. इथे पंकजा मुंडे बाजी मारतील तर जालना मध्ये मात्र रावसाहेब दानवे यांचा पराभव होऊ शकतो असे रिंगसाईड रिसर्च चा पोल सांगतो. तर ज्या औरंगाबाद लोकसभेकडेही राज्याचे लक्ष होते तिथे शिवसेना ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील असे रिंगसाईड रिसर्चच्या एक्झिट पोल मधून समोर येते आहे..
रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल काय सांगतोय?
रामटेक - शिवसेना एकनाथ शिंदेनागपूर - भाजपगडचिरोली - काँग्रेसचंद्रपूर - काँग्रेस भंडारा गोंदिया - काँग्रेसअकोला - भाजपअमरावती - भाजपवर्धा - राष्ट्रवादी शरद पवारबुलढाणा - शिवसेना एकनाथ शिंदेयवतमाळ - शिवसेना उबाठानांदेड - काँग्रेसहिंगोली - शिवसेना उबाठापरभणी - शिवसेना उबाठाबीड - भाजपउस्मानाबाद - शिवसेना उबाठाजालना - काँग्रेसलातूर -काँग्रेसऔरंगाबाद - शिवसेना उबाठाजळगाव - भाजपरावेर - भाजपधुळे - काँग्रेसनंदुरबार - काँग्रेस दिंडोरी - राष्ट्रवादी शरद पवारनाशिक - शिवसेना उबाठाअहमदनगर - राष्ट्रवादी शरद पवारशिर्डी - शिवसेना उबाठापालघर - भाजपकल्याण - शिवसेना एकनाथ शिंदेंठाणे - शिवसेना एकनाथ शिंदेभिवंडी - राष्ट्रवादी शरद पवारमुंबई उत्तर पुर्व - भाजपमुंबई उत्तर - भाजपमुंबई उत्तर मध्य - काँग्रेसमुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना उबाठामुंबई दक्षिण - शिवसेना उबाठामुंबई दक्षिण मध्य - शिवसेना एकनाथ शिंदेरत्नागिरी- सिंधुदुर्ग - शिवसेना उबाठारायगड - राष्ट्रवादी अजित पवारसोलापूर - भाजपकोल्हापूर - काँग्रेसमाढा - राष्ट्रवादी शरद पवारसातारा - राष्ट्रवादी शरद पवारहातकणंगले - शिवसेना उबाठासांगली - अपक्ष विशाल पाटीलशिरूर - राष्ट्रवादी शरद पवारबारामती - राष्ट्रवादी शरद पवारपुणे - भाजपमावळ - शिवसेना एकनाथ शिंदे
(टीप सदर बातमी "रिंगसाईड रिसर्च"या जनमत चाचणी करणाऱ्या संस्थेच्या अंदाजावर आधारीत आहे.)