Maharashtra Gram Panchayat Election Result Live Updates : राज्यातील सात हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाले आहे. यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अशातच राज्यातील 34 ठिकाणी 616 ग्रमपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. 

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. मराठवाड्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. उस्मानाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रचंड संघर्ष असलेल्या राणाजगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बीडच्या नाथ्रा गावात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कधी नव्हे ते एकत्र आलेत. चुलत बंधू अभय मुंडे यांच्या विजयासाठी पंकजा आणि धनंज मुंडेंचे कार्यकर्त्यांची एका पाहायला मिळाली तर नवगण राजुरी येथे जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. औरंगाबादेत संदीपान भुमरे यांनी ताकद लावली होती. तिथं महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला. जालन्यातील जवखेडा या गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करूनही तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झालीय. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील कुंभार पिंपळगावच्या निकालांकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आमदार मेघना बोर्डिकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी ताकद लावली होती.

Gram Panchayat Election Results 2022 : नागपूर जिल्ह्यात 236 पैकी 98 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा; दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस…

नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) 236 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहे. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) समर्थित उमेदवारांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. तर भाजप पाठोपाठ कॉंग्रेस (Congress) दुसऱ्य़ा क्रमांकावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. मात्र या निवडणुकीत शिंदे गटाने (Eknath Shinde Sivsena) ठाकरे गटापेक्षा (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)) जास्त जागा मिळवल्या आहेत, हे विशेष. नागपूर 5 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात 236 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. 

Akola Gram Panchayat Election Results 2022 : आजीचा पराभव करुन 21 वर्षाची नात बनली सरपंच

 जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींचे निकाल आज लागले असून या निवडणुकीत अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांचे गड उद्धवस्त केलेत. अनेक गावांचा कारभार गावकऱ्यांनी तरुणाईच्या हातात दिला. अकोला जिल्ह्यातील अनेक गावांचे कारभारी तिशीच्या आतले आहेत़. मात्र, जिल्ह्यातील सर्वात लहान वयाची सरपंच ठरली आहे अकोला तालूक्यातील नैराट ग्रामपंचायतची नवनिर्वाचित सरपंच प्रिया सराटे. प्रियाचं वय अवघं 21 वर्ष 6 महिने इतकं आहे. तिने नात्याने आपली आजी असलेल्या विजया सराटे यांचा पराभव केला आहे. नैराट ग्रामपंचायतीचं सरपंचपद यावर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होतं. नुकतीच बी. ए. झालेल्या प्रियाला आता गावाच्या विकासाची कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. 

Kolhapur Gram Panchayat Election Results 2022 : कोल्हापुरातील चंदगडमध्ये 'नोटा'ला बहुमत, दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी घोषित 

निवडणुकीच्या रिंगणात असलेले कोणीही पसंत नसल्यास मतदारांना 'नोटा' म्हणजे वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय देण्यात आला आहे. पण जर या नोटालाच सर्वाधिक मतं मिळाली तर? असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात (Kolhapur Gram Panchayat Election Results) घडला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार दोन नंबरची मतं घेण्याऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं.  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान मिळून देखील दोन नंबर मतदान मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले, यावर आता अनेकांनी आक्षेप घेतला. 

Maharashtra Gram Panchayat Sarpanch List 2022 : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींची यादी 

Maharashtra Gram Panchayat Sarpanch List 2022
District Name जिल्ह्याचे नाव Number of Gram Panchayat ग्रामपंचायतीची संख्या Sarpanch Name हे बनले तुमचे नवे सरपंच
Ahmednagar अहमदनगर 203 शशिकला शिवाजी पवार (निळवंडे),
Akola अकोला 266 नंदकिशोर गोरले (बोंदरखेड),प्रिया सराटे (निराट)
Amravati अमरावती 257 अलका मिलींद बोंडें, तळवेल, अस्मिता नरेंद्र कुमार पटेल (झिल्पी)
Aurangabad औरंगाबाद 219 लंकाबाई काकडे (वाघलगाव),
Beed बीड 704  
Bhandara भंडारा 363  
Buldana बुलढाणा 279 रणजित गंगतिरे (पातूरडा),
Chandrapur चंद्रपूर 59  
Dhule धुळे 128  
Gadchiroli गडचिरोली 27  
Gondia गोदिंया 348  
Hingoli हिंगोली 62  
Jalgaon जळगाव 140 किशोर भिकनराव पाटील (करजगाव),वंदना दीपक भोलाने (उंचांदे),
Jalna जालना 266 गजानन लोणीकर (लोणी),सोपान भुतेकर (टाकरवन)
Kolhapur कोल्हापूर 475 सुतार शुभांगी योगेश (निढोरी ), कवडे दिलीप रामचंद्र(व्हनाळी) ,राहुल संपतराव खोत,(रणदिवेवाडी),पाटील अनुराधा मारुती (बामणी),वीरश्री विक्रमसिंह जाधव (कसबा सांगाव),मनीषा सुरेश कांबळे (नंद्याळ),जाधव शितल संदेश (दौलतवाडी),रेखा अर्जुन जाधव (हेरवाड), वंदना सुहास पाटील (अकिवाट),सारिका कुलदीप कदम (खिद्रापूर),सविता मनोज चौगुले (टाकवडे),
Latur लातूर 351  
Nagpur नागपूर 237  
Nandurbar नंदूरबार 123  
Osmanabad उस्मानाबाद 166  
Palghar पालघर 63  
Parbhani परभणी 128  
Pune पूणे 221  
Raigad रायगड 240  
Ratnagiri रत्नागिरी 222 आर्या मोरे ठाकरे (हेदवी),निता शिंदे (शिरगाव ), पूनम मेस्त्री (चांदोर)
Sangli सांगली 452 हिराबाई पडळकर (पडळकरवाडी) ,
Satara सातारा 319 रूपाली संकपाळ (लाखवड),
Sindhudurg सिंधुदूर्ग 325  
Solapur सोलापूर 189 अनिता कोरे (मंद्रूप),
Thane ठाणे 42  
Wardha वर्धा 113  
Washim वाशीम 287  
Yavatmal यवतमाळ 100 प्रियंका निलेश जाधव (लींगी),
Nanded नांदेड 181  
Nashik नाशिक 196 भास्कर बनकर, (पिंपळगाव),गोकुळ वाघ (डोणगाव), अगस्ती फडोळ (यशवंतनगर),

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: राज्यभरातल्या 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल येण्यास सुरुवात, मविआ आणि भाजप-शिंदे गटात चुरशीची लढत