Maharashtra Election News: देशात पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सर्वेक्षण करण्यात आले आहे. टाईम्स नाऊ नवभारत आणि ईटीक्यू यांनी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे (शिवसेना) आणि देवेंद्र फडणवीस (भाजप) आणि अजित पवार (राष्ट्रवादी) यांच्या युतीचे सरकार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.


नुकतंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सामिल झाले आहेत. त्यापूर्वी हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे आताच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता त्यामध्ये अजून बदल होण्याची शक्यता आहे. 


Maharashtra Election Survey : सर्वेक्षणात लोकांना काय वाटतं?


आज लोकसभेची निवडणूक  झाली तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, असा प्रश्न या सर्वेक्षणात जनतेला विचारण्यात आला होता. सर्वेक्षणातील आकडेवारी धक्कादायक आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात भाजपला 22 ते 28 जागा मिळू शकतात, तर जर आपण महाविकास आघाडीला (राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट) 18 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. एक ते दोन जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.


देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला अजून काही महिन्यांचा अवधी आहे. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत. महाराष्ट्रातही देशभरातल्या नेत्याचे दौरे होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी भाजप, एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबतही चर्चा सुरू आहे.


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?



  • भाजपला 22 ते 28 जागा मिळू शकतात.

  • महाविकास आघाडीला 18 ते 22 जागा मिळू शकतात.

  • इतरांना 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.


अजित पवारांची बंडखोरी


राष्ट्ववादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिवसेना- भाजप युतीच्या सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. यापुढच्या निवडणुका या घड्याळ चिन्हावरच लढवल्या जाणार असं अजित पवारांनी सांगितलं. 


ही बातमी वाचा: