Maharashtra Vidhan Sabha Election 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळीची अखेर आज सांगता झाली आहे.  राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाआघाडी महाविकास आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. 


महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठीच्या मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद झाला आहे. तर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (Exit Polls) निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.  (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024) विविध संस्थांच्या या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदा नागपूर, विदर्भासह कोण बाजी महाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, सर्व एक्झिट पोलचे आकडेवारी आपण जाणून घेऊ.


सर्व एक्झिट पोलची आकडेवारी  


लोकशाही रुद्र


विदर्भ - (एकूण जागा 62)
भाजप - 23
शिवसेना (शिंदे गट) - 04
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
काँग्रेस - 21
शिवसेना (ठाकरे गट ) 04
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 04  


ZEE AI POLL


विदर्भ (एकूण जागा 62 )
महायुती 32-37
मविआ 24-29
इतर  0-2


SAS GROUP HYDRABAD


विदर्भ (एकूण जागा 62)
मविआ 33-35
महायुती 26-27
इतर 2-3


राज्यात कोणाची हाती सत्ता?


चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळेल. तर अपक्षांना 6 ते 8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे.


तर शिंदे गटाला 48 जागा आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो.


तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे


हे ही वाचा