Maharashtra Live Updates : मुंबईच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक

Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 28 Nov 2024 12:26 PM

पार्श्वभूमी

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. बहुमताचा आकडा गाठला असला तरी महायुतीने अद्याप आपल्या सरकारची स्थापना केलेली नाही. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरत नसल्यामुळे सरकारची स्थापना लांबवणीवर पडत आहे....More

नाशिकच्या पंचवटी खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

#नाशिक खून अपडेट...


नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई,नाशिकच्या पंचवटी येथील खून प्रकरणातील इतर तीन आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात...


नाशिकच्या पंचवटी परिसरात दोन दिवसांपूर्वी किरकोळ वादातून निशांत भोये या युवकाची डोळ्यात मिरचीची पूड टाकून घरदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती या संदर्भात नाशिक गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाना मोठी कामगिरी केली आहे या पुण्यातील पाच आरोपींना जेरबंद करण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. नाशिक शहर पोलिसांचे पथक दोन दिवसांपासून मारेकऱ्यांच्या मागावर होते अखेर नाशिकच्या येवला तालुक्यात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.