Maha Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE : बिग ब्रेकिंग! पुण्यात नाकाबंदीत 138 किलो सोने जप्त

Maha Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं आपापल्या परीनं उमेदवार जाहीर केले आहेत.

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 25 Oct 2024 02:02 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates : बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार अशी लढत होतेय.. होय.. शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवारला आखाड्यात उतरवलंय.. लोकसभेची...More

Pune News: पुण्यात नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं जप्त

Pune News: सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी 138 कोटींचं सोने जप्त केले.


एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले.


हे सोनं नेमकं आले कुठून, कुठे जात होते? कुणाचे होते याचा तपास आता पोलीस करत आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे..


संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत...