Maharashtra News Live Updates : उद्धव ठाकरे यांची आज कर्जतमध्ये तोफ धडाडणार
Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
उद्धव ठाकरे यांची आज कर्जतमध्ये तोफ धडाडणार
मविआचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारसभेला ठाकरे करणार संबोधित
आदित्य ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष
महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनीसुद्धा डागले होते टीकास्त्र... त्यानंतर उद्धव ठाकरे सुध्दा काय बोलणार याकडे लक्ष
उद्धव ठाकरे यांची शेवटची सभा ठरणार लक्षवेधी
आज प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार
दोन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने, तर प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार
दोन आठवड्यापासून महाराष्ट्रभर फिरत 40 पेक्षा जास्त सभा उद्धव ठाकरे यांनी घेत आपला झंजावाती प्रचार दौरा पूर्ण केला आहे
आज कर्जत आणि वांद्रे पूर्व येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत
नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा गावकरी उघडून लावली .. नायगाव तालुक्यातील सोमठाना येथे आज रात्री ही सभा अजित करण्यात आली होती .. या सभेला आमदार राजेश पवार यांच्या पत्नी पुनम पवार उपस्थित होत्या , काही वेळात आमदार पवार देखील येणार होते . मात्र त्यापूर्वी गावकऱ्यांनी ही सभा उधळून लावली .. मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी सभा होऊ दिली नाही .
पुण्यात सायबर स्कॅमर्सचा धुमाकूळ; सहा जणांना वेगवेगळ्या घटनेत 39 लाखांचा गंडा, संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
फोटो शूटला नकार, महिलेकडून फोटोग्राफरला अत्याचाराची तक्रार करण्याची धमकी, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल
गर्दीच्या वेळी ई-बस चार्जिंग करू नका; पीएमपी अध्यक्षांच्या ठेकेदार आणि आगार प्रमुखांना सूचना
रेल्वेतील अपघाती मृत्यूंमध्ये घट; मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजनांमुळे यश
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी २७ नोव्हेंबरला पुण्यात येणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात होणार सहभागी
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक
पुण्यातील डोणजे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना
पुणे ग्रामीण पोलिसांनी केली तिघांना अटक
मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे हा अद्याप फरार
विठ्ठल सखाराम पोळेकर असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव
याबाबत पोळेकर यांच्या मुलीने १५ नोव्हेंबर रोजी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पोळेकर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सिंहगड किल्ल्याजवळ फिरण्यास गेले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले. आरोपी योगेश भामे याने पोळेकर यांच्याकडे आलिशान मोटारीसह खंडणीची मागणी केली होती
पोलिसांना योगेश आणि त्याचा भाऊ रोहित किसन भामे यांनी पोळेकर यांचे अपहरण केल्याचा संशय होता.
आरोपी मोटारीतून नाशिकच्या दिशेने गेले असून, त्यात भामे याच्यासमवेत अहिल्यानगरमधील शुभम सोनवणे आणि मिलिंद थोरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी नाशिकमध्ये आरोपींचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी रेल्वेने मध्यप्रदेशमधील जबलपूरला गेल्याचे निष्पन्न झाले
पोलिसांनी जबलपूर पोलिसांच्या मदतीने दोघा आरोपींना रविवारी अटक केली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप अखेर पक्षातून निलंबित
राहुल जगताप श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवत आहेत
महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार असताना देखील बंडखोरी केल्यामुळे जगताप यांच्यावर कारवाई
यासोबतच बंडखोरी करणारे राजू तिमांडे यांच्यावर देखील निलंबांची कारवाई
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यभरात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सभा, बैठका, कॉर्नर सभांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतायत. याच टीकेला नेतेमंडळी तेवढ्याच क्षमतेने उत्तर देताना दिसतायत. दरम्यान, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. खासदार शरद पवार यांची शेवटची सांगता सभा बारामतीमध्ये होणार आहे. त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका जाहीर करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -