Maharashtra breaking News Live Updates: भाजपचा खेळ खल्लास, क्षितिज ठाकूर यांचे अभिनंदन; संजय राऊतांची प्रतिक्रिया
Maharashtra breaking News Live Updates: आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या, असा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला. विनोद तावडे यांच्याकडे डायऱ्या सापडल्या, त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा क्षितिज ठाकूर यांनी आरोप केला आहे. सदर घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठी आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयातील पूर्णपीठापुढे सुनावणी सुरू
राज्य सरकारतर्फे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा युक्तिवाद सुरू
राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ करत आहेत युक्तिवाद
राज्य सरकारनं जारी केलेल्या मराठा आरक्षणाला विरोध करत हायकोर्टात दाखल करण्यात आल्यात याचिका
विरोध करणा-या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आजपासून राज्य सरकारचा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद सुरू
विरार-नालासोपारामध्ये भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात वाद झाला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Vinod Tawade) विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विवांत हॉटेलमध्ये भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. त्यानंतर बविआकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे तुळजापूरकडे रवाना
सोलापूर विमानतळवरून तुळजापूरकडे रवाना
प्रचार तोफा थंडावल्यानंतर आज उद्धव ठाकरे सप्तनिक घेणार आई तुळजाभवानीचे दर्शन
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील सोबत आहेत
पालघर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
पालघर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक
पालघर ,बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा आणि वसई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ
सहा विधानसभा मतदार संघामध्ये 22 लाख 92 हजार इतके मतदार
एकूण 2278 मतदान केंद्र
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 12500 अधिकारी कर्मचारी 4000 पोलिस कर्मचारी 2000 होमगार्ड तसेच आठ एस आर पी एफ तुकड्या तैनात.
उद्याच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज प्रत्येक विधानसभा निहाय ईव्हीएम मशीनचे वाटप.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढत.
जिल्ह्यात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघात ९२१ मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे. मात्र जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. ३८९ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा, तर हद्दपारीच्या ४ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा महसूल आणि पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्र बूथवर मतदान यंत्र आणि कर्मचारी रवाना झाले आहेत.
मतदान केंद्र : ९२१
तिन्ही विधानसभा मतदारसंघाट एकूण उमेदवार : १७
एकूण मतदार : ६ लाख ७८ हजार ९२८
महिला मतदार : ३ लाख ४१ हजार ९३४
पुरुष मतदार : ३ लाख ३६ हजार ९९१
नवीन युवा मतदार : १२ हजार ३१६
पोलिस तैनात : १४००
निवडणूक कर्मचारी तैनात :
४५००
बडनेरा मधील महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार सुनील खराटे हे रात्री 12.30 वाजता राजापेठ येथील मुख्य प्रचार कार्यालयात बसले असते तेव्हा त्यांना फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने धमकी की, तू निवडणूकीत उभा आहे, मी पाहतो कसा निवडून येतो.. तुला आता मी पाहतो आणि शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचं सुनील खराटे यांनी माहिती दिली. आम्ही बडनेरा मतदार संघात आघाडीवर असल्याने आम्हाला जाणून बुजून कायदा हातात घ्यावा म्हणून हा प्रकार असू शकते.. मला सध्या कोणावरही शंका नाही पण पोलीसांनी योग्य तपास करावा अशी मागणी सुनील खराटे यांनी केली.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात उद्या मतदान पार पडणार असून दक्षिण मुंबईतील डिलाई रोड परिसरात स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. या ठिकाणाहून थोड्याच वेळात मतपेटी वाटण्यासाठी सुरुवात होईल. मतपेटी घेण्यासाठी सध्या या ठिकाणी जवळपास 200 ते 300 गाड्या आल्या असून काही वेळातच वाटपाला सुरुवात होईल. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मतदानाची ठिकाणे एकूण 671 असून उपनगरात 1414 ठिकाणीं मतदान करता येणार आहे. यंदा महिला संचलित 12 मतदान केंद्र आहेत तर युवा संचलित देखील 12 मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. दिव्यांग संचलित देखील ८ मतदान केंद्र शहरांमध्ये असणार आहेत. उद्याच्या निवडणुकीसाठी शहरात 11,585 तर उपनगरात 35 हजार 231 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मुंबई शहरात एकूण मतदार 25 लाख 43 हजार 710 आहेत तर उपनगरात 76 लाख 86 हजार 98 मतदार असणार आहेत.
उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज....
अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक एसडीओ कार्यालयातून मतदान केंद्राचे साहित्य होताय वितरित...
अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघांमध्ये 160 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
अमरावती जिल्ह्यात 1 हजार 282 मतदान केंद्र असून एकूण 25 लाख 46 हजार 361 मतदार आपलं हक्क बजावणार.. यामध्ये 12 लाख 52 हजार 680 महिला आणि 12 लाख 93 हजार 681 पुरुष मतदार आहेत..
या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये 2 हजार 708 कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 हजार 917 पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहे...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा राज्य उत्पादन शुल्क विभागाने देऊळगाव राजा येथील महामार्गावर असलेल्या गोडाऊन वर छापा टाकून 59 बॉक्स देशी व विदेशी मध्याचे जप्त केले आहे जवळपास तीन लाख 50 हजार रुपयांचा मध्ये साठा उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून जप्त केला आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण 8462 मतदान केंद्र
पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार
पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 88 लाख 49 हजार 590
पुणे जिल्ह्यातील एकूण पुरुष मतदारांची संख्या 45 लाख 79 हजार 216 तर महिला मतदारांची 42 लाख 79 हजार 569
पुणे जिल्ह्यात 805 तृतीयपंथी बजावणार मतदानाचा हक्क
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात 6 लाख 63 हजार
इंदापूर, भोर, मावळ आणि शिवाजीनगर पुणे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका
साल 2021 मध्ये एका वकिलाने मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीतून अख्तर यांना दिलासा
आरएसएस समर्थक ॲड. संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम 499(मानहानी), 500(बदनामी अंतर्गत शिक्षा) दाखल केलेली फौजदारी तक्रार मागे
दोघांनी प्रकरण सामंजस्यानं मिटवल्यानं कोर्टाकडून अख्तर यांची निर्दोष सुटका
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात रात्री भाजप आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला पैसे वाटत असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी मिळाली आणि त्याच्या संशयातून हा वाद झाल्याचे समोर आले. सदर घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी घटनास्थळावर तपास केला आणि त्या ठिकाणी एक इनोव्हा आणि एक स्कॉर्पिओ अशा दोन चार चाकी वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केल्याचा दिसून आले. सदरील घटनेनंतर दोन्ही अदखलपात्र गुन्हा यांच्या अनुषंगाने एका गटाचे ४ दुसऱ्या गटाचे २असे एकूण ६ इसमांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती
पुण्यातील कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदीत अडीच हजार गुन्हेगारांवर कारवाई
शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांची झाडाझडती
गेल्या दोन दिवसांत राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदीत गुन्हे शाखेकडून १५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई
सराइतांकडून २५ पिस्तूल आणि ३८ जिवंत काडतुसे जप्त
कोयते आणि धारदार हत्यारे बाळगणाऱ्या आरोपींकडून ८१ हत्यारे जप्त करण्यात आली
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमगाव पोलिसांनी कट्टीपार येथे नाकाबंदी करून 65, 870 रुपयांच्या दारू साठ्यासह दोन वाहन जप्त केली. दोन दिशेने येणाऱ्या वाहनातून दारू जप्त करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आमगाव पोलीस कट्टीपार परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या उद्या विधानसभा निवडणुकीचे मतदान बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील ११५ उमेदवारांचा भाग्याचा फैसला २१ लाख २४ हजार २२७ मतदार करणार आहेत जिल्ह्यात २२८८ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रावर उद्या मतदान होणार आहे जिल्ह्यात सातही मतदारसंघात पोलिसांचा व प्रशासनाचा चोख बंदोबस्त असून यावेळी जिल्ह्यात ७९५७ नव मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे.
चंद्रपूर : मुल तालुक्यातल्या कोसंबी येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा... मुल नगर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा केला आरोप, काल संध्याकाळी प्रचार थंडावल्या नंतर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कोसंबी गावात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रात्री जवळपास 12:30 वाजता सभा घेत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांना होता संशय, त्यामुळे काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी गाठले कोसंबी गाव, त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी विजय चिमड्यालवार यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप, भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी, सकाळपर्यंत मूल पोलीस स्टेशन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या
लोकसभेपाठोपाठच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या मुंबई पोलिसांना बॉम्ब ठेवल्याचे आणि अन्य धमक्यांचे खोटे दूरध्वनी डोकेदुखी बनू लागले आहेत.
विविध यंत्रणांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत १०० हून अधिक धमक्यांचे, बॉम्ब ठेवल्याचे दूरध्वनी आले आहेत.
यावर्षी विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सर्वाधिक म्हणजे २० हून अधिक संदेश आले होते. त्याप्रकरणी सहार व एअरपोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणुका, उत्सवांच्या पार्श्वभूमवीर पोलिसांवर कामाचा कमालीचा ताण आहे. त्यातच आता धमक्यांचे सत्र सुरू झाल्याने पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडू लागला आहे.
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात एकाच दिवसात ८५ धमक्यांचे फोन आले आल्या होत्या.
तसेच त्यापूर्वी १५ दिवसांतच ७० हून अधिक धमक्यांचे संदेश प्राप्त झाले होते. मुंबईतही याप्रकरणी २० गुन्हे दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट करावी यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाकडून अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली . पालघर शहरात असलेल्या आर्यन शाळेच्या मैदानावर 180 × 156 फुटांची विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी साकारली होती . या मानवी रांगोळीत दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून याचं अनोखा दृश्य ड्रोन मध्ये कैद करण्यात आल आहे . मानवी रांगोळीच्या सहाय्याने महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला असून यामध्ये आय विल वोट असं लिहत मतदारांना मतदानाचा आवाहन करण्यात आल .
विधानसभा निवडणुकीत एका मतासाठी मतदारांना दीड हजार रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. एक हजार देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेतले जात होते. तसेच मतदानाच्या दिवशी ५०० रुपये देऊन बोटाला शाई लावून मतदान कार्ड परत घेऊन जायचे असा हा सर्व प्रकार असल्याचे आरोप केले जात आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर हा सर्व प्रकार संजय शिरसाट यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच संजय शिरसाठ यांच्या फोननंतर पोलिसांनी दोन कोटी रुपये सोडून देण्यात आल्याचा आरोप देखील दानवे यांनी केलाय.
राहुल गांधी यांनी २ डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे
पुणे प्रथमवर्ग न्यायालयाने जारी केले आदेश
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात राहुल गांधी यांनी २ डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, असा आदेश पुणे सत्र न्यायलयाने दिला आहे
लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते
याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला
विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते
राहुल गांधी संसदेचे विरोधी पक्षनेते असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते आज न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असा अर्ज अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्यावतीने न्यायालयात दाखल केला.
हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. तसेच, येत्या दोन डिसेंबर रोजी गांधी यांनी न्यायालयात हजर राहावे, असा आदेश दिला
पार्श्वभूमी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा काल म्हणजेच सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. आता बुधवारी मतांची तोफ मतदारांच्या हाती येणार असून, ती कोणासाठी चालते आणि कोणाविरुद्ध चालते हे 23 तारखेला म्हणजेच निकालाच्या दिवशी कळणार आहे. दरम्यान, आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -