Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी झाली; भाजपने व्हिडीओ आणला समोर
Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
- 125 कोटींची उलाढाल प्रकरणी चौकशीसाठी माजी खा. किरीट सोमय्या मालेगावात दाखल..
- ज्या तरुणांच्या नावाने बँकेत व्यवहार झालेत त्यांच्याशी गाठी भेटी सुरू..
- फिर्याद दिलेल्या मुलांच्या भेटी घेत घेतली माहिती..
- नामको बँकेमध्ये मध्ये देखील घेणार भेट..
- छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात चर्चा करणार..
- व्होट जिहाद साठी हा पैसा वापरला गेल्याचे किरीट सोमय्या यांनी केले होते ट्विट द्वारे आरोप.
सावनेर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी मतदारांना नतमस्तक होऊन यावेळी परिवर्तन नक्की करा असे आवाहन केले आहे. गुंड, भ्रष्टाचारी, बदमाश लोकांना घरी पाठवा म्हणत सुनील केदार वर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करणारे पालघरचे मावळते आमदार श्रीनिवास वनगा एकनाथ शिंदे यांना घेण्यासाठी पालघरच्या हेलिपॅडवर दाखल. श्रीनिवास वनगा यांची नाराजी मिटवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याच्या चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी श्रीनिवास वनगा पालघर पोलीस परेड ग्राउंडच्या हेलिपॅड वर दाखल .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील मिशन मुंबई
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ७२ समन्वयकांकडे मुंबईत ‘एक है तो सेफ है’ची जबाबदारी
मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघांचे दोन समन्वयक बजावणार महत्त्वाची भूमिका
प्रत्येक बुथवरील मतदारांमध्ये संघाकडून जनजागृती सुरु
लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या मतदारसंघाकडे संघांचे विशेष लक्ष
एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना हृदय विकाराचा त्रास...
उपचारासाठी तातडीने मुंबईत हलवले
प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीला मालेगाव येथे व त्यानंतर उपचारार्थ मुंबई येथे रुग्णालयात केले दाखल..
मुफ्ती इस्माईल हे MIM चे मालेगाव मध्य येथील विधानसभा निवडणुकीचे उमेदवार
मुफ्ती इस्माईल यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना..
मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यकर्ते चिंतेत..
अहिल्यानगर- आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केले आहे...अहिल्यानगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा आरक्षणबाबत ठोस भूमिका मांडत नाही, आता ते सांगतात की आमच्या पक्षाचे पन्नास ते साठ आमदार निवडून येणार आहेत... त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपल्या जाहीरनाम्यात काहीही उल्लेख नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत बाजू प्रभावीपणे मांडली नाही, त्यामुळे आरक्षण मिळाले नाही असा आरोपही यावेळी रमेश केरे पाटील यांनी केला आहे... तर काँग्रेस मराठा आरक्षणाबाबत शब्दही काढत नसल्यामुळे या तिन्ही पक्षांना मराठा समाजाने मतदान करू नये असे आवाहन मराठा ठोक क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
कोल्हापुरात बोगस तपासणी पथकाने व्यवसायिकाचे 25 लाख रुपये लांबवल्याची घटना
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून फसवणूक
पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घटना
याबाबत व्यापारी सुभाष लक्ष्मण हारणे या व्यापाऱ्याची गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद
पोलिसांची पाच पथके संशयितांचा शोध घेत आहेत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे (Anil Deshmukh 100 crore bribery case) आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही असं म्हटलंय. एबीपी माझाचे ज्येष्ठ प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी न्या. चांदीवाल यांची EXCLUSIVE मुलाखत घेतली... या मुलाखतीत न्या. चांदीवाल यांनी स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत असं न्या. चांदीवाल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात. मात्र अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा न्या. चांदीवाल यांनी एबीपी माझावर सपशेल फेटाळला आहे.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले मोठे गौप्यस्फोट-
1. देशमुख आणि वाझेकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, शपथपत्रात वाझेनं अजित पवार, शरद पवारांची नाव घेतली. पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे ओळखून नाव रेकॉर्डवर घेतली नाहीत
2. चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लीनचिट असा शब्दप्रयोग नाही, उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत अशी टिपण्णी.
3. वाझे, परमबीर आणि देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाझेनं साक्ष फिरवली अशा आशयाचा चांदिवाल यांची प्रतिक्रिया आहे
4. तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं सुरू होतं , साक्षी पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले
5. अहवालाच्या बाबी कोणत्याच सरकारच्या पचनी पडणार नाही.
उद्धव ठाकरेंची दोनदा बॅगांची तपासणी केल्याचं समोर आल्यानंतर भाजपचा निशाणा
काही नेत्यांना तमाशा करायची सवयच असते म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी झालेला कोल्हापूर विमानतळावरील ५ नोव्हेंबरचा व्हीडीओ समोर आणला
देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बॅगांची तपासणी...दोनदा निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आल्याचं भाजप महाराष्ट्राचे ट्विट
दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात, ट्विटद्वारे ठाकरेंना भाजपचे टोमणे
उद्धव ठाकरेंची दोनदा बॅगांची तपासणी केल्याचं समोर आल्यानंतर भाजपचा निशाणा
काही नेत्यांना तमाशा करायची सवयच असते म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी झालेला कोल्हापूर विमानतळावरील ५ नोव्हेंबरचा व्हीडीओ समोर आणला
देवेंद्र फडणवीस यांच्या देखील बॅगांची तपासणी...दोनदा निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आल्याचं भाजप महाराष्ट्राचे ट्विट
दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात, ट्विटद्वारे ठाकरेंना भाजपचे टोमणे
पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारींवर प्रशासनाचं मौन; पुणेकरांचे हाल
बेकायदेशीर शस्त्र बाळगाल तर खबरदार; पुणे पोलिसांनी १० महिन्यात जप्त केली १०२ पिस्तुल
शेअर मार्केटच्या नादात गमावले तब्बल २६ लाख; कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पती- पत्नीच्या भांडणात जावयाला काढले चोपून ; सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आचारसंहिता भंग; तिघांवरून गुन्हा, वारजे भागात विनापरवानगी सभेचे आयोजन
165 अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अंधेरी पश्चिमेकडील दुर्गा माता गावदेवी डोंगर भागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तूंचा टेम्पो येणार असल्याची चाहूल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना लागताच मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले शिवसैनिकांनी निवडणूक फ्लाईंग स्क्वाड आणि पोलिसांना पाचारण करून तक्रार करून आणलेल्या सर्व भेटवस्तू जप्त केल्या आहेत. मध्यरात्री साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास गावदेवी डोंगर परिसरात मतदारांना भेटवस्तू वाटण्यासाठी हा ट्रक आला होता.मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू वाटपाचा हा कार्यक्रम उधळून लावला.
जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा
जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लब मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारा कडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप
पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा यांना देखील मारहाण
ड्रायडे असताना मातोश्री क्लब मधील रेस्टॉरंट अँड बारमध्ये साडेतीनशे जणांचा जमाव असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप...
महेंद्र थोरवे यांच्या जाहीरनाम्याची अपक्ष उमदेवार सुधाकर घारे यांच्याकडुन पोलखोल
आमदार नसताना जी विकासकामे झाली ती थोरवे यांच्या नावावर- सुधाकर घारे यांचा घणाघात
महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या विकासकामांची अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत केली पोलखोल
महेंद्र थोरवे यांनी नेमकी कोणती आणि कशी कोट्यवधी रुपयांची केलीत विकासकामे
जर आमदारांनी 2900 कोटी रुपयांचा निधी आणला असेल तर तो कोठे गेला
जेव्हा ते आमदार नव्हते तेव्हाच ही कामे झाली मंजूर - घारे
आमदार नसताना जी विकासकामे झाली ती त्यांच्या नावावर
मग एवढा निधी त्यांच्या घराच्या सुशोभिकरणासाठी तर गेला नाही ना हे तपासावे लागेल - घारे यांचा थोरवे यांच्यावर आरोप
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी उद्या बुधवारी (दि.१३) निवडणुका होणार आहेत तसेच १० राज्यांत ३१ विधानसभा जागा, केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुका होतील. वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात असून तेथील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह राज्यसभा सदस्य महुआ माजी, गीता कोडा, मंत्री बन्ना गुप्ता, पूर्णिमा दास, सुखराम ओरांव इत्यादी प्रमुख नेते रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. विधानसभेच्या ३१ जागांपैकी २८ जागांवरील आमदार लोकसभा निवडणुकीत लढून विजयी ठरले होते. तर, रायबरेली येथून जिंकल्यामुळे राहुल गांधी यांनी वायनाड येथील जागा सोडली होती. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर
दुपारी एक वाजता पालघर विधानसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी पालघर मध्ये घेणार प्रचार सभा
तर दुपारी दोन वाजता बोईसर विधानसभेचे उमेदवार विलास तरे यांच्यासाठी मनोर येथे घेणार प्रचारसभा
मुंबई शहर व उपनगरांतील प्रदूषणाने अत्यंत घातक पातळी गाठली आहे. वाढते बांधकाम प्रकल्प, असंख्य वाहने, उद्योग-धंद्यांपासून निर्माण होणाऱया प्रदूषणाने मुंबईकरांच्या शरिरात श्वसनाद्वारे पाचहून अधिक सिगारेटच्या धुराएवढा घातक धूर जमा होत आहे. मुंबईतील स्थिती वर्षागणिक आणखी बिकट बनत चालली आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षांत मुंबईत दिल्लीसारखी स्थिती बनण्याची भीती आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. दरम्यान, आजदेखील राज्यातील प्रमुख नेत्यांच्या राज्यातील वेगवेगळ्या भागांत सभा होणार आहेत. सभांच्या माध्यमातून हे नेतेमंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -