Maharashtra News Live Updates : भिवंडी शहरातील नायगाव परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीला लागली आग
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
भिवंडी ब्रेकिंग...
भिवंडी शहरातील नायगाव परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीला लागली आग
काही दिवसांपासुन बांधकाम बंद असलेल्या बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावरील लाकडांनी घेतला पेट
स्लॅब ला सपोर्ट देण्यासाठी लावलेला लाकडी बांबूला भीषण आग
आगीचे कारण अस्पष्ट
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाची घटनास्थळी एक गाडी दाखल
यात कोणतीही जीवित हानी झाली नसून
बांधकाम करण्यात येणारे संपूर्ण लाकडं जळून खाक
पुणे
पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या होम वोटिंग आज पासून सुरू होत आहे .
शिवाजीनगर पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात असणाऱ्या डेक्कन भागात होम वोटिंग सुरी झालंय
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी होम वोटिंग
सुविधा आज पासून सुरू होत आहे
85 वयापेक्षा जास्त असलेले नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती
घरबसल्या 12 डी फॉर्म भरून पोस्टर बॅलेटने मतदान करणार आहेत
सकाळी साडेआठ पासून ते पाच वाजेपर्यंत होम वोटिंग प्रक्रिया सुरू असणारे
पुण्यातील रामचंद्र गोडबोले या ९४ वर्षीय काकांनी मतदानाचा हक्क बजावला
महायुतीची १४ नोव्हेंबरला शिवाजीपार्कच्या मैदानात सभा होण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीच्या सभेसाठी मैदान मिळाव यासाठी जी नॉर्थ विभागाच्या अधिकाऱ्याना पत्र
महायुतीच्या सभेसाठी मैदान मिळणार की नाही याबाबत दुपार पर्यंत प्रशासनाकडून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार
गोराईच्या बाबर पाडा येथे महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाच्या जंगलदृश्य भागात गोणीत मिळालल्या मृतदेहान खळबळ
अज्ञात व्यक्तीची शरीर, हात, पाय, धड अश सात भागात केली निर्घृण हत्या
हत्या करणाऱ्या व्यक्तीने मृतदेहाचे विविध अवयव आधी प्लास्टिक डब्यात भरून त्यानंतर ते प्लास्टिक गोणीत ठेवले होते
या गोण्या अज्ञात व्यक्तीने शेफाली गाव, फिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या मार्गावर पुरावे नष्ठ करण्याच्या हेतूने जंगलसदृश्य झाडीत टाकले होते
मृतदेहाच्या दुर्गंधीने हीबाब समोर आल्यानंतर आता गोराई पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान गोणीत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सभा
मालाड पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस काय बोलणार?
मालाड मालवणीत रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीवर भाजपची सातत्याने टीका
धर्मांतर कायद्यासंदर्भात घोषणेनंतर मालाडमध्ये फडणवीसांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष
‘बटेंगे कटेंगे’वर फडणवीस पुन्हा बोलणार का?
राजे शहाजी मैदानावर आज रात्री ९ वाजता सभेचे आयोजन
सोबतच, लोखंडवालामध्ये वर्सोवा आणि गोरेगाव विधानसभेसाठी रात्री ८ वाजता जाहीर सभा
कांग्रेसचे आणखी ७ बंडखोर उमेदवारांचे निलंबन
आधीच्या यादीत २१ जणांचं १६ मतदारसंघात बंडखोरी केल्या प्रकरणी निलंबन केल होत
एकुण २८ कांग्रेस बंडखोरांच ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे
आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल
आचारसंहितेचा भंग, निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून फिर्याद
धनंजय महाडिक यांनी वक्तव्याबद्दल केलेला खुलासा अमान्य- निवडणूक निर्णय अधिकारी
लाडकी बहीण योजनेवरून धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात केले होते विधान
पार्श्वभूमी
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. बडे नेते रात्रंदिवस एक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सभा, पत्रकार परिषदा यांच्या मार्फत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) 10 नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याच दिवशी भाजपानेदेखील (BJP) आपला जाहीरनामा लोकांपुढे ठेवला आहे. त्यामुळे आज याच जाहीरनाम्यातील तरतुदींवरून टीका-टिप्पणी होऊ शकते. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -