मुंबई : महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रभावी रणनीती निर्णायक ठरली आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या प्रचाराला राज्यातील जनतेने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निकालांतून स्पष्टपणे दिसून आला आहे असं भाजपने त्यांच्या पत्रकात म्हटलं आहे. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या अजेंड्याला शहरी मतदारांनी भरघोस पाठिंबा दिला. त्याचवेळी शहरी मतदारांची अचूक नस ओळखत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही निकालांवरून स्पष्ट झाले आहे असं पत्रकात म्हटलं आहे.

जानेवारी महिन्यात भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी राज्यभरात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले होते. त्याचवेळी त्यांनी संघटनात्मक पातळीवर अर्धी लढाई जिंकली होती, हे आजच्या दणदणीत विजयातून अधोरेखित झाले आहे.

Continues below advertisement

भाजप हा धोरण आखणारा आणि ते प्रभावीपणे अंमलात आणणारा पक्ष आहे. निवडणूक नियोजन, उमेदवार निवड, प्रचारसभा तसेच विरोधकांची रणनीती अचूकपणे ओळखण्याचे कसब ‘देवेंद्र–रविंद्र’ या जोडीने दाखवून दिले. सरकार आणि भाजप प्रदेश संघटना यांच्यातील समन्वयामुळेच हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांनी पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट केली आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा, मातीशी जोडलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला संघर्षातून घडलेला अध्यक्ष लाभला आहे. निवडणूक काळात झालेल्या वैयक्तिक टीकेने ते कधीही विचलित झाले नाहीत. उलट, विरोधकांना अनावश्यक विषयांत गुंतवून ठेवत भाजपाचा विजय अधिक सुकर केल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले.

25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रत्येक टीकेनंतर अधिक ताकदीने पुढे जाणारे नेतृत्व म्हणून रविंद्र चव्हाण यांची ओळख आज अधोरेखित झाली आहे. संघर्षातून घडलेला, मुरलेला आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांचा उदय या विजयातून स्पष्टपणे दिसून आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांच्या संघटनात्मक ताकदीची आणि 24 तास पक्षासाठी समर्पित कार्यशैलीची पूर्ण जाणीव आहे. शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव, कायम ‘इलेक्शन रेडीनेस’ असलेली कार्यपद्धती आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून संपूर्ण राज्यात उभे केलेले कार्यकर्त्यांचे जाळे हे भाजपासाठी निर्णायक ठरले आहे.

आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके महत्त्वाचे ठरले, तितकाच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा व्यापक आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येत आहे. संपूर्ण विजयाची आकडेवारी समोर आल्यानंतर या यशाची व्याप्ती आणखी ठळकपणे स्पष्ट होणार आहे.

ही बातमी वाचा: