मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिका (Mahapalika election) निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं असून 90 जागांसह सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचं प्राथमिक आकडेवारीवरुन पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मुद्दा यंदाच्या निवडणुकीत मुंबईसाठी महत्त्वाचा ठरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणात मराठी आणि महाराष्ट्र याच मुद्द्यावर भाषण केलं. आपल्या भाषणातून भाजपचेतेलंगणातील नेते के. अण्णामलाईंचा (Annamalai) उल्लेख रसमलाई म्हणून केला. त्यानंतर, सोशलमीडियावरअण्णामलाई चांगलेच ट्रेंड झाल्याचे दिसून आले. मुंबई महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य अण्णामलाई यांनी केलं होतं. आता, भाजपच्या विजयानंतर अण्णामलाईंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेनं निर्णायक कौल दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुतीलामिळालेलं घवघवीत यश मिळालं आहे. देवेंद्रफडणवीस यांच्या ध्येयवादी कामगिरीवर आधारित शक्तिशाली जनादेशमहायुतीला मिळाला आहे. गावखेड्यापासून ते महानगरांपर्यंत 'ट्रिपल इंजिन' नेतृत्वावर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे, विकास आणि प्रगतीच्या राजकारणाचा हा पुरावा आहे, येथील जनतेनं निराधार आणि फूट पाडणाऱ्या प्रचाराला नाकारले, असे म्हणत अण्णामलाई यांनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांचे अभिनंदन, ज्यांच्या धडाडीच्या नेतृत्वात प्रशासनाची व्याख्या प्रत्येक स्तरावर नव्याने लिहण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी दृष्टीकोनातून प्रेरित होऊन महाराष्ट्र आता वेगाने एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असेही अण्णामलाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत प्रचारासाठी आलेल्या अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे म्हटल्याने चांगलाच वादंग निर्माण झाला होता. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, मुंबईमहाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव असून अण्णालाईंचं वक्तव्य तेच सांगते असा आरोप ठाकरे गटाकडून, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णामलाईंचं
